किंग खान शाहरुखनं त्याच्या चाहत्यांना व्हॅलेंटाईनच्या निमित्तानं चाहत्यांना आगळं वेगळं गिफ्ट दिलं आहे. त्याचा बहुचर्चित असा डंकी नावाचा चित्रपट हा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. गेल्या वर्षी शाहरुखचे जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले ते सर्व ओटीटीवर आल्यानं चाहत्यांमध्ये वेगळाच आनंद आहे.
मागील वर्षी शाहरुखचा पठाण, जवान आणि डंकी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या तीनही चित्रपटांनी चाहत्यांची मोठी पसंती मिळवल्याचे दिसून आले. पठाणनं तर बॉक्स ऑफिसवर तब्बल हजार कोटींची कमाई केली होती. या पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या जवाननं देखील सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई करुन आपली वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी नावाच्या चित्रपटातून शाहरुखनं आपणच अजून बॉलीवूडचे किंग असल्याचे दाखवून दिले होते. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. या सगळयात शाहरुखनं आता व्हॅलेटाईनच्या निमित्तानं त्याचा डंकी नावाचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट त्याच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.
डंकीमध्ये शाहरुख खानसह तापसी पन्नु, विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका असून शाहरुखनं पहिल्यांदाच राजकुमार हिरानी यांच्यासोबत केलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. एका वेगळ्या विषयावर भाष्य करत त्याची प्रभावी मांडणी हिरानी यांनी आपल्या चित्रपटातून केली होती. खरं तर बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना डंकी ओटीटीवर कधी येणार याची कमालीची उत्सुकता होती.
नेटफ्लिक्सनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन डंकी प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. शाहरुखच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याच्या जवान २ ची चर्चा आहे. त्याच्या सिक्वेलवर काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शाहरुख ऑपरेशन खुखरीमध्ये देखील दिसणार आहे.