बांगलादेशातील अंतरिम सरकार घेणार मृत हिंदू व्यक्तीच्या कुटुंबाची जबाबदारी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गेल्या आठवड्यात जमावाकडून क्रूरपणे ठार करण्यात आलेल्या हिंदू व्यक्तीच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यास सरकार तयार आहे, असे बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या वरिष्ठ सल्लागारांनी सांगितले आहे.

सल्लागार सौ. आर. अब्रार यांनी मंगळवारी २५ वर्षीय दिपू दास यांच्या कुटुंबाची भेट घेतली. १८ डिसेंबर रोजी मयमनसिंह येथे जमावाने त्यांची हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता. राज्य सरकारने दिपू दास यांच्या मुलगा, पत्नी आणि पालकांची जबाबदारी घेण्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचे अन्नार यांनी सांगितले. वस्त्रनिर्मिती कारखान्यात काम करणाऱ्या दास यांच्या हत्येचे समर्थन नसलेली अमानुष गुन्हेगारी कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले. कुटुंबाची भेट घेण्यापूर्वी मी मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याशी चर्चा केल्याचे अब्रार यांनी सांगितले.

वृत्तपत्रातील अहवालांनुसार, दास यांचे वडील रविचंद्र दास यांनी आपल्या मुलाच्या हत्येनंतर न्याय मिळण्याची मागणी केली असून, कुटुंबाची परिस्थिती सल्लागारांसमोर मांडली. दास यांच्या कुटुंबाला आर्थिक व कल्याणकारी मदत दिली जाईल आणि संबंधित यंत्रणा पुढील काळात त्यांच्या संपर्कात राहतील, असे युनूस यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले. या हत्येप्रकरणी आतापर्यंत बारा जणांना त्यांच्या कथित सहभागासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

पुन्हा हिंसाचार 
बांगलादेशमध्ये बुधवारी रात्री राजधानी ढाक्यातील मोघबझार भागात एका व्यक्तीने गावठी बाँबचा स्फोट घडवून आणला. त्याने उड्डाणपुलावरून बाँब खाली फेकला. या स्फोटात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ढाक्यात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. येथील एका चर्चच्या जवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसराचा ताबा घेत हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.