‘खूप चुका केल्या, उद्धटपणा केला, पण तिने सांभाळून घेतलं…’

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
कोणासाठी असं म्हणाला शाहरुख?
कोणासाठी असं म्हणाला शाहरुख?

 

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या जुन्या दिवसांबद्दल अनेकदा बोलले आहे. शाहरुख खाननेही अनेकवेळा आपल्या चुकांबद्दल बोलले आहे. आता किंग खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो त्याची पत्नी गौरी खानबद्दल खूप भावूक होत आहे.

किंग खानने असेही सांगितले की गौरीनेच त्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी साथ दिली. ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. खरं तर ही क्लिप खूप जुनी आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये शाहरुख खान आपल्या पत्नीचे कौतुक करत आहे. शाहरुख खान म्हणाला, ‘मला असं वाटत गौरीने मला प्रचंड सांभाळलं. मी खूप चुका केल्या, उद्धटपणा केला, गैरवर्तन केले. पण गौरीने मला अनेक ठिकाणी शांत केले.
 
अनेकदा मी गैरवर्तन केलं. योग्य निर्णय घेतले नाही, गौरीने अशा वेळी शांत राहून माझी साथ दिली.’ असे म्हणत शाहरुख याने त्याच्या आयुष्यात गौरीचं असलेलं महत्त्व सर्वांसमोर सांगितलं. शाहरुख खान आणि गौरी खान यांची प्रेमकहाणी बॉलिवूडच्या सुपरहिट प्रेमकथांपैकी एक आहे. शाहरुख खान आणि गौरी यांचा विवाह २५ ऑक्टोबर १९९१ रोजी झाला होता. दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे. अलीकडेच अलाना पांडेच्या लग्नात शाहरुख आणि गौरीने जबरदस्त डान्स केला.

‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी जगभरात नवीन विक्रम रचले. २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. फक्त भारतातच नाही तर, जगभरात चित्रपटाने नवे विक्रम रचत वेगळी ओळख निर्माण केली.