मिमिक्री आर्टिस्ट आणि अभिनेता फिरोज खान काळाच्या पडद्याआड

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
मिमिक्री आर्टिस्ट आणि अभिनेता फिरोज खान
मिमिक्री आर्टिस्ट आणि अभिनेता फिरोज खान

 

फिरोज खान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, फिरोज खान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी, त्यांचे चाहते आणि त्यांचे कुटुंबीय फिरोज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करीत आहेत.

फिरोज खान यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, त्यांनी अनेक कॉमेडी टेलिव्हिजन सिरीयलमध्ये, काम केले आहे. ‘जिजाजी छत पर है’, ‘भाभीजी घर पर है’, ‘हप्पू की उल्टान पलटन’, ‘साहिब बिवी और बॉस’ आणि ‘शक्तीमान’ सारख्या अनेक सीरियल्स त्यांच्या हिट सीरियल्स ठरल्या आहेत.

फिरोज खान हे फक्त अमिताभ बच्चन यांचीच नक्कल करीत नव्हते. तर, दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र आणि सनी देओल यांचीही ते नक्कल करायचे.