प्रियांका चोप्रा-कतरिना कैफच्या 'जी ले जरा'मध्ये दिसणार शाहरुख खान?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 8 Months ago
हे मोठे अपडेट आले समोर
हे मोठे अपडेट आले समोर

 

बॉलिवूडचा अभिनेता फरहान अख्तरने बऱ्याच वर्षांनी पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तो लवकरच त्याचा 'जी ले जरा' हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये प्रियांका चोप्रासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटात शाहरुख खानही दिसणार असल्याची बातमी आहे.

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान देखील जी ले जरा या चित्रपटाचा एक भाग आहे आणि तो या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या मते, शाहरुख खान फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटात दिसणार आहे, परंतु त्याने कॅमिओसाठी होकार दिला आहे.

मात्र, या वृत्ताला किंग खानने दुजोरा दिलेला नाही. शेवटच्या वेळी त्याने रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्रमध्ये कॅमिओ केला होता, ज्यामध्ये त्याने मोहन भार्गवची भूमिका केली होती. सध्या शाहरुख खान त्याच्या नवीन चित्रपट जवानामध्ये व्यस्त असल्याची माहिती आहे. यामध्ये त्याच्यासोबत साउथ अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे. त्याचे दिग्दर्शक अॅटली आहेत, ज्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानने रॉ एजंटची भूमिका साकारली होती.

यासोबतच मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच त्याने खतरनाक अॅक्शन आणि स्टंट सीन्सने रसिकांची मने जिंकली आहेत. 'जवान' नंतर शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या डंकी या चित्रपटात दिसणार आहे.