‘वैष्णव जन तो’ भजन गाऊन मिळाली मनशांती: ए आर रेहमान

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Rahman
Rahman

 

‘गांधी गोडसे एक युध्द’ या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचे ‘वैष्णव जन’ अनावरण करण्यात आले. स्वर्गीय नरसिंह मेहता लिखित गाणे श्रेया घोषाल यांनी गायले आहे.. संगीतकार ए आर  रेहमान ने संगीतबद्ध केले आहे. 
 
जवळपास एक दशकानंतर राजकुमार संतोषी यांनी चित्रपट सृष्टीत आगमन करून चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यासंदर्भात बोलताना रेहमान म्हणाले कि, राजकुमार सर हे एक दिग्गज आहेत त्यांच्यासाठी या संगीतासाठी काम करणे, एक सुंदर अनुभव होता.  
 
गांधीजींचे आवडते भजन ‘वैष्णव जन तो’ हे होते. त्यामुळे या गाण्याचे विशेष महत्व आहे. ज्या ज्या वेळेस मी यावर काम केले त्यावेळेस या गाण्याच्या माध्यमातून एक वेगळ्याच प्रकारचे मानसिक समाधान लाभले. शिवाय हे गाणे दर्शकांच्या मनातही प्रेम आणि मनशांती च्या भावना जागृत करेल अशी माझी खात्री आहे असे रेहमान यांनी सांगितले.  
 
जॅकी भगनानीच्या रेकॉर्ड लेबल जस्ट म्युझिकद्वारे या गाण्याचे सादरीकरण झाले. हे गाणे देशभक्तीची भावना जागृत करते. राजकुमार संतोषी यांची कन्या तनिषा संतोषी यांनी, 'गांधी गोडसे एक युद्ध' बद्दलची प्रत्येक गोष्ट एक खजाना आहे ज्याला मी कायम जपून ठेवीन असे उद्गार काढले. 
 
'वैष्णव जन तो' हे माझे पहिले गाणे होते. शिवाय ते गुजराती भाषेत असल्याने मला त्याची अनेक दिवस आधीच तयारी करावी लागली. शिवाय, महान गायिका श्रेया घोषाल मॅडम यांच्या कडून असाही  आग्रह होता कि, त्यांना ए.आर. रहमान सरांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यावर गायचे होते. त्यासाठीही  मला माझे सर्वोत्तम द्यायचे होते.
 
गाण्यात साहजिकच डान्स स्टेप्स नव्हते, त्यामुळे शक्य तितके माझ्या भावनांना माझ्या डोळ्यांतून व्यक्त करायचे होते. त्यामुळे एकूणच माझ्यासाठी हा एक उत्साहवर्धक अनुभव होता.'गांधी गोडसे एक युद्ध' हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांच्या विरोधाभासी विचारसरणीचा एक अनोखा विचार मांडतो. संतोषी प्रॉडक्शन एल एल पी  प्रस्तुत, हा चित्रपट पिव्हीर पिक्चर्स द्वारे रिलीज होईल. मनिला संतोषी निर्मित हा चित्रपट 'गांधी गोडसे एक युद्ध' २६ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल झाला.