बॉलीवूड अभिनेता आणि निर्माता आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर' या चित्रपटासंबंधी गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा रंगल्या होत्या. विशेषतः सेन्सॉर बोर्डान सूचवलेल्या कट्सविषयी आणि भारतात चित्रपट प्रदर्शित होणार की नाही, यावर संशय व्यक्त करण्यात आला होता; मात्र आता स्पष्ट झालं आहे, की आमिर खानने सेन्सॉर बोर्डच्या सर्व सुचवलेल्या बदलांना मान्यता दिली आहे.
यू ए १३+ श्रेणीतील सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवण्यात यश मिळवलं आहे. 'आमिर खान फिल्म्स एलएलपी' या नव्या कंपनीतर्फे सेन्सॉर बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांमुळे आमिर खान भारतात चित्रपट प्रदर्शित करण्यावरच विचार करत असल्याचे बोलले जात होते; पण आताच्या घडामोडींवरून हे स्पष्ट होतं, की 'सितारे जमीन पर' हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पॅनिश चित्रपटाचा अधिकृत रिमेक असून, एका निलंबित बास्केटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यातील बदलांची कथा आहे.
या प्रशिक्षकाला दिव्यांग खेळाडूंच्या संघाला एका मोठ्या स्पर्धेसाठी तयार करण्याची जबाबदारी मिळते. आर. एस. प्रसत्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया डिसूझा प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट २० जून ल रोजी रोजी चित्रपटगृहात चित्रपटगृहात ह होणार आहे.