ऑस्करविजेत्या गाण्यावर थिरकले बॉलिवूडचे तीन खान

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
शाहरुख, सलमान आणि आमिर एकत्र
शाहरुख, सलमान आणि आमिर एकत्र

 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स हे गेल्या दोन दिवसांपासून जामनगरमध्ये सुरु आहेत. जामनगरमध्ये १ मार्च रोजी कॉकटेल पार्टी झाली आहे तर २ मार्च रोजी विविध बॉलिवूडमधील कलाकारांनी प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म केलं. अशताच या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये शाहरुख खान , सलमान खान आणि आमिर खान यांनी खास परफॉर्मन्स केला. त्यांच्या या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये शाहरुख, सलमान आणि आमिर यांनी नाटू नाटू या गाण्यावर डान्स केला. यावेळी तिन्हीही खाननं त्यांच्या आयकॉन डान्स स्टेप्स केल्या. तिन्हीही खानच्या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांची 'नाटू नाटू' या गाण्यातील हुक स्टेप करण्याचा प्रयत्न शाहरुख, सलमान आणि आमिर करताना दिसत आहेत. पण नंतर सलमान त्याच्या 'जीने के है चार दिन' या गाण्याची हुक स्टेप करतो.
 
पाहा व्हिडीओ
अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दिलजीत दोसांजनं देखील गाणं गायलं तसेच या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, सैफ अली खान, जान्हवी कपूर, अजय देवगण, शाहरुख खान, आलिया भट्ट, करीना कपूर यांनी देखील हजेरी लावली.

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये प्रसिद्ध हॉलिवूड गायिका रिहानानं देखील परफॉर्म केलं.रिहानानं अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये परफॉर्म करायला तब्बल ५२ कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे, असं म्हटलं जात आहे.