ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आकस्मिक निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  vivek panmand • 6 Months ago
सतीश कौशिक
सतीश कौशिक

 

 नुकतीच जावेद अख्तर यांच्यासोबत साजरी केली होती होळी

 बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले. सतीश कौशिक यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. कारण सतत हसणारे आणि हसवणारे सतीश कौशिक यांची अचानक एक्झिट सगळ्यांच्याच जिव्हारी लागली आहे.

 
सतीश यांनी कायम आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांना हसवले. खऱ्या आयुष्यातही ते तितकेच आनंदी असायचे. त्यामुळे मनोरंजन विश्वात त्यांची एक वेगळीच प्रतिमा होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते आनंदी होते. हाच त्यांचा आनंद दर्शवणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जी त्यांची शेवटची पोस्ट ठरली.
 
सतीश कौशिक दोन दिवसांपूर्वीच होळी साजरी करण्यासाठी कलाकारांमध्ये सामील झाले होते. यावेळी त्यांनी रंगपंचमीचा तूफान आनंद लुटला. सोबत हे फोटो शेयर करत एक ट्विटही केले. त्यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये होळीच्या शुभेच्छा देत लिहलंय की, 'हा.. रंगाचा, आनंदाचा सण, जावेद अख्तर यांची होळी पार्टी...' सोबतच.. 'भेटा या नवविवाहीत जोडप्याला' म्हणत अली फझल आणि रिचा चड्ढा यांच्यासोबतही त्यांनी फोटो पोस्ट केला होता.
 
त्यांचं हे ट्विट आता व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते प्रचंड आनंदी दिसत आहेत. ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांच्या घरी या होळी पार्टीच आयोजन करण्यात आल होत. या पार्टीत ते सहभागी झाले होत.
 
सतीश कौशिक यांनी आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1993 मध्ये त्यांनी 'रूप की रानी चोरों का राजा' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आत्तापर्यंत त्यांनी वीसहू दिग्दन अधिक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.