दूर्वा उत्तम औषधी गुणांनी उपयुक्त आहेत. त्याचा उपयोग धार्मिक कार्य अन् औषध निर्मितीत होऊ लागला आहे. घरगुती औषध म्हणून दुर्वांचा अधिक उपयोग केला जातो. गणेश स्थापनेलाही दुर्वा वाहण्याची मोठी परंपरा आहे.
प्रत्यक्षात ती धार्मिक उपयोगापुरती ही वनस्पती नाही. तर ती एक औषधी वनस्पती आहे. धार्मिक विधीत वापरल्या जाणाऱ्या बहुतांश वनस्पती या उत्तम औषधी गुणांनी युक्त आहेत. मात्र काळाच्या ओघात त्याचा औषधी उपयोग मागे पडून केवळ धार्मिक विधीपुरते त्याचे महत्त्व मानले जाते. पण प्रत्यक्षात औषधी उपयोगाचा वापर वनस्पतीचा उपयोग व्हावा हाच संदेश धार्मिक उपयोगातून मिळतो.
घोळाणा फुटणे म्हणजे अचानक नाकातून रक्त वाहण्याच्या प्रकारात दुर्वांचा रस उपयुक्त ठरतो. याशिवाय दुर्वांचा रसापासून आता फेसपॅकदेखील वापरला जातो. त्वचा व रक्तविकारासाठी ही दुर्वा उपयुक्त ठरते.
सोलापूरचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अभिजित पुजारी यांनी सांगितले की, "दूर्वा या उर्ध्वगरक्तपित्त गुणासाठी ओळखल्या जातात. त्या गुणाने शीतल असतात. त्यामुळे काही आयुर्वेदिक औषधींची निर्मिती दुर्गांच्या आधारे केली जात आहे."
डिटॉक्स ड्रिंक
दुर्वेपासून डिटॉक्स ड्रिंक तयार करता येते. त्यामध्ये दुर्वा, पुदिना, लिंबाची पाने, मध व पाणी एकत्र करून मिश्रण करावे. हा रस डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येईल.
ठळक बाबी...
-
क्लोरोफील - शरीर शुद्धीसाठी
-
फ्लाव्होनॉईडस अँटी ऑक्सिडंट, त्वचेसाठी फायदेशीर
-
टॅनिन्स - जखमा भरून काढणारे
-
ग्लायकोसाईडस - हृदयक्रियेसाठी हितकारक
-
अमिनो अॅसिड - पेशींच्या दुरुस्तीसाठी
यासाठी करतात वापर
-
रक्त गळत असल्यास तत्काळ दुर्वेचा रस पिल्यास रक्तस्त्राव थांबतो.
-
पुरळ, खाज अन् घामतोडसाठी त्वचेवर दुर्वेचा रस लावता येतो.
-
ताप आल्यास दुर्वांचा रस साखरेसोबत घ्यावा.
-
मुत्रदाहासाठी दुर्वाचा रस साखरेसोबत घेतल्यास उपयुक्त ठरते.
-
दूर्वा वाटून जखमेवर लावल्यास रक्त थांबून जखम भरण्यास मदत होते.