वायू प्रदूषणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून देशातील १.४ अब्ज एवढे लोक हे ज्या ठिकाणी धुलिकणांच्या प्रदूषणाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक आहे त्या भागात वास्तव्यास असल्याचे दिसते. दूषित हवेमुळे त्यांच्या आयुष्यातील साडेतीन वर्षे कमी होत असल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) याबाबत निश्चित केलेल्या नियमांचा या ठिकाणी कधीच भंग झाला आहे. अगदी देशातील सर्वाधिक स्वच्छ हवा असलेल्या प्रदेशात 'डब्लूएचओ'च्या मानकांची पूर्तता केल्यानंतरही लोकांना ९.४ महिन्यांचेच अतिरिक्त आयुर्मान लाभू शकते, असा दावा ताज्या अहवालामध्ये करण्यात आला आहे.
शिकागो विद्यापीठातील 'एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट'ने तयार केलेल्या अहवालामध्ये भारतात हवेतील 'पीएम-२.५' या सुक्ष्म धुलिकणांचे प्रमाण हे २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये खूप अधिक असल्याचे दिसून आले आहे. 'डब्लूएचओ'च्या मानकानुसार है प्रमाण आठपटीपेक्षाही अधिक आहे. हे प्रमाण जागतिक मानकांच्या पातळीवर आले तरीसुद्धा भारतीयांच्या सरासरी आयुर्मानामध्ये केवळ ३.५ वर्षांचीच भर पडू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२१ सालच्या हवा गुणवत्तेसंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 'पीएम-२.५' या कणांसाठी वार्षिक सरासरी मर्यादा ही प्रति क्युबिक मीटर पाच मायक्रोग्रॅम एवढी निश्चित करण्यात आली आहे तर 'पीएम-१०' या कर्णासाठी हे प्रमाण प्रति क्युबिक मीटर पंधरा मायक्रोग्रॅम एवढे आहे. भारत सरकारने तयार केलेल्या नियमांशी याची तुलना केली असता ही मर्यादा अधिक काटेकोर असल्याचे दिसून येते. भारताने 'पीएम-२.५' या धुलिकणांसाठी ही मर्यादा ४० मायक्रोग्रॅम एवढी निश्चित केली असून 'पीएम-१०' या कांसाठी हे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम एवढे आहे.
...तरीही दीड वर्षांचा लाभ
देशातील ४६ टक्के लोकसंख्या ही अशा प्रदेशात वास्तव्यास आहे ज्या ठिकाणी पीएम-२.५' या धुलिकणांचे प्रमाण राष्ट्रीय मानकान्वये (चाळीस मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर) निश्चित करण्यात आलेल्या प्रमाणापेक्षा कित्येकपटीने अधिक आहे. याबाबतीत आपण राष्ट्रीय मानकांनी निश्चित केलेली पातळी गाठू शकलो तरीसुद्धा या प्रदेशातील नागरिकांच्या आयुर्मानामध्ये दीड वर्षांची भर पडू शकते.
मैदानी प्रदेशात प्रदूषण अधिक
उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात प्रदूषणाचे प्रमाण हे सर्वाधिक असून या भागामध्ये आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या मानकांचे पालन करण्यात आल्यास ३८.९ टक्के भारतीय नागरिकांच्या आयुर्मानामध्ये सरासरी पाच टक्क्यांची वाढ होऊ शकते. याच नियमाला अनुसरून देशभरातील सुक्ष्म धुलिकणांचे प्रमाण हे कमी केल्यास भारतीयांचे सरासरी आयुर्मान हे ८.२ वर्षांनी वाढू शकते
या ठिकाणी प्रदूषण अधिक
दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र