डॉ. मुकर्रम खान यांनी सलग १२ तास शस्त्रक्रिया करत रचला इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 d ago
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात ५१ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर चष्मे वाटपावेळी उपस्थित डॉक्टर व परिचारिका
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात ५१ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर चष्मे वाटपावेळी उपस्थित डॉक्टर व परिचारिका

 

धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. यात अवध्या बारा तासांत तब्बल ५१ रुग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुकर्रम खान यांनी या शस्त्रक्रिया केल्या. संबंधित रुग्णांना चष्मे वाटपानंतर घरी सोडण्यात आले.

येथील हिरे मेडिकलच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी (ता. ३१) मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. हिरे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित पाठक, उपअधिष्ठाता डॉ. अमिता रानडे, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत कुमावत, संध्या चौधरी उपस्थित होते. जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दोडामणी यांच्या हस्ते रूग्णांच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.

७० रुग्ण दाखल
हिरे मेडिकलला शहरासह ग्रामीण भागातून ७० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले. त्यांची आरोग्य तपासणी झाली. याकामी औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. निर्मलकुमार वंदळे, डॉ. आशिष कांकरिया डॉ. मैथिली महाले, भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. जया दिघे, डॉ. आश्विनकुमार देवरे, डॉ. साद नादवी, डॉ. रामेश्वर सोनवणे, डॉ. अर्चित यांचे सहकार्य लाभले. ऑप्टोमेट्रिस्ट सत्येंद्र सोनगीरकर व सहकाऱ्यांनी तपासणीकामी सहकार्य केले. रक्त व सूक्ष्मजैव तपासण्या डॉ. माया वसईकर व डॉ. रविंद्र खडसे यांनी केल्या.

डॉ. खान यांची किमया
केली, त्यांना नेत्र शल्यचिकित्सा विभागातील सर्व रुग्णांचे अहवाल प्राप्त झाल्यावर ५१ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले, नंतर एकमेव डॉ. मुकर्रम खान यांनी न थांबता गुरुवारी सकाळी आठ ते रात्री आठ, अशा बारा तासांत ५१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. जिवांक्षा पोवार, डॉ. विनोद धूत. डॉ. अमोल घुले, डॉ. निकिता इंगोले, डॉ. आदिती कासट, डॉ. अनंत मांडवे यांनी सहकार्य केले. आंतरवासितांमध्ये डॉ. अब्दुल चौधरी, डॉ. रवी चौधरी, डॉ. निलेश राऊत, डॉ. ऋषभराठोड, डॉ. मृणाल देसाई, डॉ. रेजिना परेरा, डॉ. रामशा कुरेशी यांनी काम पाहिले.

अनेकांचे विशेष सहकार्य
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विवेक जाधव, हिरे मेडिकलच्या अधिसेविका अरुणा भराडे, सहायक अधिसेविका यशोदा नाईक, ओपीडी प्रभारी ज्योती वळवी, ओटी प्रभारी संगिता अहिरे, नर्सिंग टीम, आहारतज्ज्ञ प्रतिक्षा नवघरे, वॉर्ड व्यवस्थापक साधना पाडवी, श्रद्धा पाटील, निलेश वाडेकर, प्रवीण माळी, पुष्पा कुवर, अतुल अधमकर, निलम धूम, सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेत आशाबाई पवार, विशाल हिवराळे, पवन डामरे, विनोद सोनार, के. एन. सोनवणे आदींचे विशेष सहकार्य लाभले.