अब्दुल रेहमान मक्की दहशतावदी घोषित

Story by  test | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
अब्दुल रेहमान
अब्दुल रेहमान

 


न्यूयॉर्क (पीटीआय) : भारतातील अनेक घातपाती कारवायांचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी पाकिस्तानच्या अब्दुल रेहमान मक्की याला आज संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. मक्की हा २६/११ हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हा फीज सईदचा मेहुणा आहे.


संयुक्त राष्ट्राने जारी केलेल्या निवेदनात ६८ वर्षीय अब्दुल रेहमान मक्कीला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ (दाऐश) आणि अल कैदा प्रतिबंधक समितीनुसार जागतिक दहशतवादी जाहीर केल्याचे म्हटले आहे. या घोषणेनंणेनंतर मक्कीची मालमत्ता जप्त होईल आणि त्याच्या प्रवासावर निर्बंध घातले जातील.


मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केल्यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताचे  कायम प्रतिनिधी आणि राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी कारवाईचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे चीन हा भारताला रोखू शकत नाही, असा एकप्रकारे संदेश जगभरात गेला आहे. चीनने वारंवार भारताच्या न्याय मागण्यांत अडथळे आणले. आणखी काही दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे बाकी आहे, असेही अकबरुद्दीन म्हणाले. दहशतवादी अब्दुल रेहमानने भारतात अनेक घातपाती कारवाया केल्याचे शिफारस समितीने म्हटले आहे.


२२ डिसेंबर २००० मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्याच्या हल्ल्याचा मक्की सूत्रधार होता. लष्करे तय्यबाच्या सहा दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यात घुसखोरी करत सुरक्षा दलावर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जवानांसह तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने विशेष प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यांत सुरक्षा परिषदेत चीनने पाकिस्तानच्या मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्यापासून वाचविले होते. यावेळी मक्की विरुद्द भारत आणि अमेरिकेने संयुक्त प्रस्ताव आणला. त्याला चीन विरोध करू शकला नाही.