‘अखिल भारतीय मुशायरा’ कार्यक्रमात सहभागी शायर. डावीकडून अब्दुल हमीद हुनर, तन्वीर सोलापुरी, शाहनवाज काजी सईल, अंजुम बाराबंकवी, सागर त्रिपाठी, डॉ. लता हया, डॉ. कासिम इमाम.
दर्द ए मोहब्बत, दर्द ए जुदाई दोनो को एक साथ मिला
तू भी तनहा, मै भी तनहा आ इस बात पे हात मिला
यांसारख्या शेर-ओ-शायरीने ३५व्या पुणे फेस्टिवलमध्ये आयोजित ‘अखिल भारतीय मुशायरा'ने वातावरण शायराना झाला होता. या मुशायऱ्याला देशभरातील उर्दू आणि हिंदी भाषेतील शायर उपस्थित होते. 'धार्मिक सौहार्द' अशी थीम असलेल्या या मुशायऱ्याचे आयोजन पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार आणि डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा आबेदा इनामदार यांनी केले होते. कार्यक्रमात पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष ॲड. अभय छाजेड उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून मुशायरास सुरुवात झाली. त्यांनतर विविध शायरांनी आपल्या शायरीतून सामाजिक एकता व समता यांचे संदेश दिले. त्यास प्रेक्षकांनी मोठा प्रतिसादही दिला.
गझल को इतने महेजोमे, इतना लहेजा पसंद आया
की शहजादी को एक मजदूर का बेटा पसंद आया
अकोल्याचे शायर अबरार काशिफ यांनी सादर केलेल्या अशा अनेक शायरींना रसिकांनी वाहवा, क्या बात है म्हणत, वन्समोर देत दाद दिली.

पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’ कार्यक्रमात दीपप्रज्वलन करतांना डॉ. पी. ए. इनामदार, अबेदा इनामदार, ॲड. अभय छाजेड, अंजुम बाराबंकवी, डॉ. लता हया, एम. डी. लॉरेंस व इकबाल अंसारी.
तर मालेगावहून आलेल्या फरहान दिल यांनी सादर केलेल्या,
‘सौ जख्म लगे है तो संभल कयू नही जाता, इस दिलसे मोहब्बत का खल्ल कयू नही जाता
दिल लेके भटकता हू मै बाजारे वफा मे, ये इष्क को सिकका है तो चल क्यू नही जाता...’
या गझलला आणि शाहनवाज काजी सईल यांनी सादर केलेल्या,
‘मुझे तुम भूल जाने मे जरासी देर तो करते
नया रिश्ता बनाने मे जरासी देर तो करते
मुझे फिर इष्क करना था, मुझे फिर दिल लगाना था.
मुझे तुम याद आने मे जरा से देर तो करते...
जरासी देर हो जाती तुम्हे पलके झुकाने मे, या फिर पलके उठाने मे , जरासी देर तो करते
मोहब्बत नही सौदे की गुंजाईश मगर जाना, वफा को बेच आने मे जरासी देर तो करते...’
या गझलला रसिकांनी भरभरून दाद दिली. फेस्टिवलबद्दल बोलताना ॲड. अभय छाजेड म्हणाले, “माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी ३५ वर्षांपूर्वी पुणे फेस्टिवलला सुरुवात केली. संपूर्ण देशात अशा प्रकारचा हा एकमेव फेस्टिवल आहे. त्यामुळे त्याला ‘मदर ऑफ ऑल फेस्टिवल’ म्हटले जाते. या फेस्टिवलमध्ये दरवर्षी अखिल भारतीय मुशायराचे आयोजन केले जात असून हा फेस्टिवल राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे.”
मुशायरा कार्यक्रमाबद्दल बोलताना आबेदा इनामदार म्हणाल्या, “संपूर्ण जगाला माणुसकीचा, एकतेचा संदेश ‘अखिल भारतीय मुशायरा’ या कार्यक्रमातून दिला जातो. मला पूर्ण विश्वास आहे की या प्रयत्नात आपण यशस्वी होऊ.”
रात्री उशिरापर्यंत ही मैफल रंगली होती. मुशायरात भोपाळचे डॉ. मंजर भोपाली, मुंबईच्या डॉ. लता हया, लखनौच्या अंजुम बाराबंकवी, अकोल्याचे अबरार काशिफ, हैदराबादचे सरदार सलीम, वाराणसीचे सागर त्रिपाठी, मुंबईचे डॉ. कासिम इमाम, मालेगावचे फरहान दिल, अब्दुल हमीद हुनर, शाहनवाज काजी सईल, अब्दुल हमीद इनामदार, तन्वीर सोलापुरी सहभागी झाले होते.
टाळ्यांचा कडकडाट, तरुणाईने शिट्या वाजवून दिलेली दाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कासिम इमाम व इक्बाल अन्सारी यांनी केले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -