उत्तर प्रदेशातील वादग्रस्त माजी आमदार मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 30 d ago
मुख्तार अन्सारी
मुख्तार अन्सारी

 

तुरुंगात असलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी याचा तीव्र हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. छातीत अत्यंत वेदना होऊ लागल्यानं तातडीनं त्याला बांदा इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच त्याची प्राणज्योत मालवली. समाजवादी पार्टीनं ट्विट करत अन्सारीच्या मृत्यूचं वृत्त दिलं आहे.

अन्सारीच्या घराबाहेर मोठी गर्दी
मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच त्याच्या गाझीपूर इथल्या निवासस्थानाबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या बातमीमुळं कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून ज्या रुग्णालयात सध्या त्याचं पार्थीव ठेवण्यात आलं आहे, त्या बांदा मेडिकल कॉलेजबाहेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. 

कोण हाता मुख्तार अन्सारी?
मुख्तार अन्सारी हा समाजवादी पार्टीकडून पाच वेळा आमदार राहिला होता.

त्याच्यावर ६१ हत्येचे, खंडणीचे आणि जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल होते.

कॉन्ट्रॅक्टर सच्चिदानंद राय यांच्या हत्येचा गुन्हा अन्सारीवर होता.

त्याचबरोबर काँग्रेस नेते अवधेश राय यांची त्यानं काशी इथं हत्या केली होती.

भाजपचा आमदार कृष्णानंद राय यांच्यावर अन्सारी यानं २१ गोळ्या झाडल्या होत्या.