दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन बंदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राजधानी नवी दिल्लीमध्ये १५ वर्षांहून जुन्या डिझेल वाहनांना आणि १० वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन मिळणे आजपासून बंद झाले आहे. तसेच पोलिसांनी अशा वाहनांची जाती सुरू केली असून हवेतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्लीतील सर्व पेट्रोल पंपांवर विशेष पथके तैनात केली आहेत.

दहा वर्षे आणि पंधरा वर्षांची वयोमर्यादा पार करणाऱ्या पेट्रोल, डिझेल वाहनांसाठी राजधानी दिल्लीत इंधन बंदी लागू करण्यासाठी राजधानीतील अनेक पेट्रोल पंपांवर एआय कॅमेरे आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. या इंधनबंदीच्या अंमलबजावणीसाठी दिल्लीच्या एक है १०० क्रमांकाच्या पेट्रोल पंपांवर पोलिसांची तर १०१ ते १५९ क्रमांकाच्या पेट्रोल पंपांवर परिवहन विभागाच्या ५९ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

एकूण ३५० चिन्हित पेट्रोल पंपांवर एक वाहतूक पोलीस अधिकारी नेमला जाणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक पंपावर २ अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात केले जातील, तसेच ५०० हून अधिक पेट्रोल पंपांवर नंबर प्लेट तपासून वाहनाचा कार्यकाळ ठरविणारे 'ऑटोमेटेड नंबर प्लेट रिकमिशन' कॅमेरे बसवले गेले आहेत. या अंतर्गत पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका पेट्रोल पंपावरून दोन जुनी वाहने जप्त केली आहेत.

दरम्यान, वाहन जाती कारवाईनंतर चार चाकी वाहनांसाठी दहा हजार रुपये, तर दुचाकी वाहनांसाठी पाच हजार रुपये दंड आकारणी केली जाईल. सोल वाहन ओढून नेण्याचे टोइंग) आणि वाहन तळावर ठेवण्याचे (पार्किंग) शुल्कही वाहनचालकाकडून वसूल केले जाणार आहे.

हे तुघलकी फर्मान : 'आप'
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये दहा आणि पंचरा वर्षे जुन्या वाहनांना इंधन बढ़ी लागू करण्याच्या निर्णयावर आम आदमी पक्षाने (आप) टीका केली आहे ही इंधनबंदी म्हणजे तुघलकी फान असून स्थानिक गरजेसाठी जुनी वाहने वापरणारे ज्येष्ठ नागरिक काय करतील," असा सवाल 'आप'च्या नेत्या आतिशी यांनी केला. वाहनाचा जुनेपणा आणि प्रदूषण यांचा अर्थाअर्थी संबंध नसल्याचाही दावा आतिशी यांनी केला, दिल्लीमध्ये १५ वर्षांहून जुन्या डिझेल वाहनांना आणि १० वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन विक्री बंद झाली असून पोलिसांनी ही वाहने जात करण्याचा इशाराही दिला आहे. 

त्यापार्श्वभूमीवर आतिशी यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर तुघलकी फर्मान बजावल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, 'दिल्लीतील सामान्य लोक कार्यालयात जाण्यासाठी दुचाकी वाहनांचा वापर करतात. अनेक ज्येष्ठ नागरिक स्थानिक वापरासाठी जुन्या (सेकंड हँड) दुचाकींचा वापर करतात. त्यांनी काय करावे, त्यांनी चालत निघावे काय?" असा संतप्त सवाल केला.