मालेगाव स्फोट: 'दहशतवादाला कोणताही धर्म नसतो' - दिग्विजय सिंह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 30 d ago
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह

 

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी (३१ जुलै) म्हटले आहे की, दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडले जाऊ नये आणि कोणताही धर्म हिंसाचाराचे समर्थन करत नाही.

राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, अतिरेकी हे असे व्यक्ती असतात जे द्वेष पसरवण्यासाठी धर्माचा विपर्यास (गैरवापर) करतात. निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या सात आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा समावेश आहे. भाजप नेत्यांनी असा दावा केला आहे की, 'भगवा दहशतवाद' ही संज्ञा दिग्विजय सिंह यांनीच तयार केली होती.

"ना कोणताही हिंदू दहशतवादी असू शकतो, ना मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन," असे सिंह यांनी निकालानंतर संसद परिसरात माध्यमांना सांगितले. "प्रत्येक धर्म प्रेम, सदिच्छा, सत्य आणि अहिंसेचे प्रतीक आहे," असे ते म्हणाले, सर्व धर्म शांततेवर आधारित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी 'हिंदू दहशतवाद' ही संज्ञा तयार केली होती, या भाजप नेत्यांच्या आरोपांना त्यांनी फेटाळून लावले. 'भाजप हे 'हिंदू दहशतवाद' ही संज्ञा काँग्रेसने तयार केली असे म्हणत पूर्णपणे चुकीचे बोलत आहे,' असे सिंह यांनी स्पष्ट केले.

२००८ च्या मालेगाव स्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. महाराष्ट्रातील मालेगाव शहरात एका मस्जिदीजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणात 'विश्वसनीय आणि ठोस' पुराव्यांच्या अभावामुळे आणि सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.