जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये भूकंपाचा धक्का; ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला सोमवारी (२ फेब्रुवारी) पहाटे भूकंपाचा धक्का बसला. 'नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी'ने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ इतकी नोंदवण्यात आली आहे. हा भूकंप सोमवारी सकाळी ५:३५ झाला.

भूकंपाचा केंद्रबिंदू बारामुल्ला जिल्ह्यात जमिनीत १० किलोमीटर खोल होता. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

विशेष म्हणजे, या घटनेच्या काही तास आधी भारताच्या दुसऱ्या टोकालाही भूकंपाचे धक्के जाणवले. सोमवारी पहाटे ३:३० अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाची नोंद झाली. तेथे रिश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला. एकाच दिवशी पहाटेच्या सुमारास देशातील दोन वेगवेगळ्या भागांत भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत.