दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी चौघांना अटक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी वेगाने तपास करत या प्रकरणी ४ संशयित आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे बॉलिवूड वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, या गोळीबारामागे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याची दाट शक्यता आहे. पोलीस या माहितीची पडताळणी करत असून त्या दिशेने सखोल तपास सुरू आहे. या हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी कारवाई दरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त केली आहेत. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर रोहित शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर संभाव्य आरोपींचा आणि मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.