अर्थ मंत्रालयाने आर्थिक परिक्षण अहवाल जारी केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की देशाच्या आर्थिक विकासाचा वेग चांगला आहे, खाजगी गुंतवणुकीतही वाढ होत आहे, परंतु तेलाच्या वाढत्या किंमती चिंता वाढवू शकतात.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आर्थिक परिक्षण अहवालानुसार देशाचा जीडीपी या वर्षी ६.५ % दराने वाढेल. मान्सूनमुळे जीडीपीलाही आधार मिळेल. मात्र, यासोबतच कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींबाबतही आर्थिक आढावा अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
बँकिंग क्षेत्राबाबत अहवालात म्हटले आहे की, बँकिंग क्षेत्रातील ग्रॉस एनपीए १० वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. यासोबतच मान्सूनचा वेग वाढल्यानेही चांगली चिन्हे दिसू लागली आहेत. महागाईबद्दल बोलायचे झाले तर खाद्यपदार्थांच्या किंमती कमी होत आहेत.
अहवालात चिंतेची बाब कोणती?
आर्थिक अहवालानुसार, तेलाच्या किंमतींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तेलाच्या किंमती वाढल्याने चिंता वाढली असली तरी सध्या कोणताही धोका नाही. याशिवाय शेअर बाजारातही घसरणीच्या धोक्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.. यासोबतच जगातील भू-राजकीय तणावामुळे गुंतवणुकीत घट होण्याचीही शक्यता आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही चिंतेचा विषय आहे.
अर्थ मंत्रालयाने अहवालात म्हटले आहे की चांगली देशांतर्गत मागणी आणि गुंतवणुकीमुळे आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत GDP ७.८ टक्के राहिला आहे. मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शहरी भागातील बेरोजगारी कमी झाल्याने वस्तू आणि सेवांची मागणी वाढली आहे.