कतारमध्ये आठ भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. याप्रकरणात एक आनंदाची बातमी हाती आली आहे. या प्रकरणी भारतीय परराष्ट्राच्या कूटनितीला यश आहे. या अधिकाऱ्यांना कायदेशीर मदत मिळणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोपात भारताच्या ८ नौदलाच्या अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा झाली होती. या प्रकरणी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची मोठी अपडेट दिलीय.
परराष्ट्र मंत्रालयाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याविषयीची माहिती दिलीय. भारत सरकार माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना सर्व कायदेशीर आणि राजनैतिक मदत करणार आहे. आम्ही कुटुंबियांच्या वतीने अपील दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणात दोन सुनावणी झाल्या आहेत. या प्रकरणात आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. ज्यामध्ये केस पाहणे आणि सर्व कायदेशीर-सल्लागार सहाय्य प्रदान करणे समाविष्ट आहे.
आमच्या राजदूताला ३ डिसेंबर रोजी तुरुंगातील सर्व ८ जणांना भेटण्यासाठी कॉन्सुलर ऍक्सेस मिळाला असून त्यांची भेट घेतली. याशिवाय COP28 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद यांची भेट झाली. त्यांच्यात याप्रकरणी चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी कतारच्या अधिकाऱ्यांनी ८ भारतीयांना इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. हे सर्व भारतीय नौदलाचे माजी कर्मचारी असून त्यात माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.