'मँगोमॅन' करीमुल्ला खान

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 10 Months ago
मँगो मॅन करीम खान
मँगो मॅन करीम खान

 

आंब्याच्या अनेक जाती, प्रजाती तुम्ही ऐकून असाल. प्रत्येक प्रदेशातला एखादा खास प्रकारचा आंबाही असतो. वर्षातून एकदाच येणारं हे फळं बहुतेकांचं प्रिय असतं. पण तुम्ही असं कधी ऐकलंय का, की एकाच आंब्याच्या झाडाला ३०० प्रकारचे आंबे लागतात. पण अशी किमया कलीम उल्लाह खान यांनी केली आहे.

 
कलीम उल्लाह खान हे भारताचे मँगो मॅन म्हणून ओळखले जातात. शिवाय त्यांना ३०० प्रकारच्या आंब्यांचे जनकही म्हटले जाते. आपल्या १२० वर्ष जुन्या आंब्याच्या झाडाला भेटण्यासाठी ते रोज सकाळी उठून एक मील लांब जातात.
 
कलीम उल्लाह मलिहाबादच्या एका लहानशा शहरातले आहेत. त्यांनी त्यांची ही बाग इथेच लावली आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार कलीम उल्लाह सांगतात की, अनेक दशकांपासून तळपत्या उन्हात केलेल्या मेहनतीचं गोड फळ म्हणून त्यांना हे झाड मिळालं आहे. सामान्य नजरेने हे फक्त एक झाड दिसेल. पण नीट विचार केला तर हे एक झाड, एक बाग आणि एक अख्खं आंब्याचं कॉलेज आहे.
 
शाळा सोडल्यावर त्यांनी ग्राफ्टिंगमध्ये आपला पहिला प्रयोग केला. त्यांनी आंब्याच्या नव्या प्रजाती बनवण्यासाठी रोपांचे वेगवेगळ्या भागांचा समावेश केला. अशा प्रकारे ७ नव्या प्रकारचे फळ तयार करण्यासाठी त्यांनी एका झाडाचे पालन पोषण केले. पण ते झाड वादळात तुटले. त्यानंतर १९८७ च्या काळात त्यांनी पुन्हा प्रयोग सुरु केला. या प्रकारात त्यांनी १२० वर्ष जुना नमुना बनवला. ज्याला ३०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे आंबे लागतात. त्या प्रत्येक आंब्याचा आपला असा वेगळा रंग, आकार, चव आहे.
 
ऐश्वर्या आंबा सगळ्यात फेमस
त्यांनी सुरुवातीच्या काही प्रकारांपैकी एकाचं नाव अभिनेत्री आणि १९९४ ची मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय वरून ऐश्वर्या असं ठेवलं. आजवरच्या त्यांच्या सर्वात उत्तम उत्पादनापैकी ऐश्वर्या हे आंब्याचं फळ आहे. या आंब्याची खासियत सांगताना ते म्हणाले, हा आंबा पण ऐश्वर्यासारखाच सुंदर आहे. या एकेका आंब्याचं वजन एक किलोपेक्षा जास्त असतं. याची साल बाहेरून लाल रंगाची असते आणि चवीला हा फार गोड असतो.
 
ऐश्वर्या शिवाय यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाचेही आंब्याची प्रजाती आहे. दुसरे म्हणजे "अनारकली", किंवा डाळिंबाचे फूल, आणि त्यात वेगळ्या त्वचेचे दोन थर असतात आणि दोन वेगळ्या कोयी असतात. प्रत्येकाला वैशिष्ट्यपूर्ण सुगंध असतो.
 
खान यांच्या या अनोख्या संशोधनामुळे त्यांचा अनेकवेळा सन्मान झाला आहे. २००८ मध्ये भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी पदमश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय इराण, युएईमधूनही निमंत्रण आले आहे. खान यांचा दावा आहे की, ते वाळवंटातही आंबे उत्पादन करू शकतात. कोरोना काळात करीम यांनी आंब्याच्या प्रजातीचा शोध लावला होता, त्या प्रजातीला 'डॉक्टर आंबा' असे नाव देण्यात आले होते.