"भाषा हे संवादाचे माध्यम आहे. भाषा विवादाचे माध्यम होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव असलेला मराठी माणूस संकुचित विचार करूच शकत नाही. छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित झालेले मराठे संपूर्ण देशासाठी आणि संस्कृतीसाठी लढले. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितले. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान असायलाच हवा, पण त्याचबरोबर इतर भारतीय भाषाही अवगत असल्यापाहिजे आणि त्यांचा अभिमानही वाटला पाहिजे," असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील छत्रपतीशिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र, आंतरराष्ट्रीय अध्ययन संस्थानच्या कोनशिलेचे अनावरण तसेव कुसुमाज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचे उद्घाटनफडणवीस यांनी केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेंशन सेंटरच्या सभागृहात आज सायंकाळी झालेल्या या समारंभात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, "छत्रपतींनी तयार केलेली सामरिक शक्ती आणि युद्धनीतीचा वापर केल्याने संपूर्ण देशामध्ये मराठ्यांचा बोलबाला झाला. छत्रपतींनी मराठ्यांमध्ये रुजवलेल्या विजोगिषु वृत्तीतून अटकेपार झेंडा फडकविला, त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास करणारे अध्यासन केंद्र राजधानीत 'जेएनयू मध्ये व्हावे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींची राजमुद्रा पंतप्रधान मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर अंकित केली आहे. देशातील अतिप्राचीन भाषांपैकी एक अशा मराठी भाषेचेही अध्यासन होत आहे. मराठी भाषेने संपूर्ण भारताला समृद्ध केले आहे. मराठी नेहमीच अभिजात होती, पण पंतप्रधान मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन राजाश्रयासह राजमुद्रा उमटवली."
"भाषा ही संवादाचे माध्यम आहे. भाषा विवादाचे माध्यम होऊच शकत नाही. भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो. मातृभाषा ही महत्वाची आहेच. प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आणि आग्रही आहे. पण त्याचसोका इतर भारतीय भाषांचाही अभिमान आम्ही बाळगला पाहिजे. कारण भारतीय भाषांचा तिरस्कार करून इंग्रजीचा पुरस्कार करतो तेव्हा दुःख होते.
या ठिकाणी मराठी की हिंदी असा वाद नाही. मराठी माणसाला मराठी शिवाय पर्यायच नाही. ज्या राजधानीला वाचविण्यासाठी मराठ्यांनी अनेकदा बलिदान दिले त्या दिल्लीमध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी अध्यासन होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे." असे ते म्हणाले.
सामंत यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी अध्यासन केंद्र तसेचशिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी 'जेएनयू'च्या कुलगुरु तसेच मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिलेल्या सहकार्यांचा उल्लेख केला.
शिवरायांच्या नावाने देशाची ओळख
छत्रपतींच्या नावाची काही बोटावर मोजण्याइतपत लोकांना अॅलर्जी आहे. पण त्यामुळे काळजी करू नका. हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला जात होता. आजही ओळखला जात आहे आणि उद्याही शिवरायांच्याच नावाने ओळखला जाईल, असे फडणवीस म्हणाले. उदय सामंत यांनी दोन्ही अध्यासनांसाठी पुढाकार घेऊन केलेल्या कामाची तसेच 'जेएनयू'च्या परिसरात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली.