सामाजिक सलोख्याच्या संदेशासह पुण्यात पैगंबर जयंती साजरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
सिरत कमिटीच्यावतिने हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन
सिरत कमिटीच्यावतिने हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत महंमद पैगंबर यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. तसेच पुणे शहरामध्ये देखील जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. यंदाचे वर्ष हे १५०० वे जयंती वर्ष असल्यामुळे यावर्षी अधिक उत्साहाने व धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करत मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. सिरत कमिटीच्या वतिने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या मुख्य मिरवणुकीची सुरुवात नाना पेठेतील मन्नूशाह मशिदीपासून झाली. त्यानंतर संत कबीर चौक, एडी कॅम्प चौक, भारत चित्रपटगृह, पदमजी पोलिस चौकी, निशांत चित्रपटगृह, भगवानदास चाळ, चुडामण तालीम चौक, मुक्तीफौज चौक, कुरेशी मशिद, जान महंमद रस्ता, बाबाजान चौक, चारबावडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, भोपळे चौक, पूलगेट चौक, महात्मा गांधी रस्ता, महंमद रफी चौक, कोहिनूर चौक, महावीर चौक, सरबतवाला चौक, क्वार्टर गेट चौक, संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना चित्रपटगृह, हमजेखान चौक, महाराणा प्रतापसिंह रस्ता, गोविंद विंद हलवाई चौक, सुभानशहा दर्गा चौक या मार्गांनी मिरवणूक निघून शुक्रवार पेठेतील सिटी जामा चौक येथे समाप्त झाली. 
 

यावेळी जवळपास सर्वच प्रमुख चौकांमध्ये विविध पक्ष संघटना व स्वयंसेवी संस्थांच्या वतिने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. ही मिरवणुक  डिजे विरहीत निघाल्याने परिसरातील नागरिकांनी याचे विशेष कौतुक केले. दरम्यान पैगंबर जयंतीचे  १५०० वे वर्ष असल्याने सिरत कमिटीच्या वतिने शहरातील विविध भागात वर्षभर प्रबोधनात्मक कार्यक्रम  केले जाणार असल्याचे सिरत कमिटीचे सिराज बागवान व जावेद शेख यांनी सांगितले.

यावेळी सह पोलिस आयुक्त रंजन कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "पुण्यातील सिरत कमिटीचे पदाधिकारी अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी करत आहेत. ते सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैगंबर जयंती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर साजरी करण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले."

याप्रसंगी सह पोलिस आयुक्त रंजन कुमार , पोलिस उपायुक्त विवेक मासाळ , मौलाना ज़मीरुद्दिन, मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन, मौलाना खालिद निजामी, मौलाना गुलाम अहमद खान , रफीउद्दिन शेख ,माजी आमदार मोहन  जोशी, रिपब्लिकन सोशालिस्ट पाक्षाचे  राहुल डंबाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रशांत जगताप , माजी नगरसेवक अविनाश बागवे, डॉ. सिध्दार्थ धेंडे, सिराज बागवान, जावेद खान, आबिद सय्यद , जावेद शेख , हाजी नजीर तांबोळी , आसिफ शेख , सूफियान कुरैशी आदि मान्यवर उपस्थित होते. 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter