युपी : मोहर्रम आणि कावड यात्रेनिमित्त ‘अशी’ वाढवली सुरक्षा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मोहर्रम आणि कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुरादाबाद शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत. दोन्ही उत्सवांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शहर पोलीस अधीक्षक (SP City) रणविजय सिंह यांनी दिली.

शांतता समितीच्या बैठका आणि मार्ग निश्चिती
शहर पोलीस अधीक्षक रणविजय सिंह म्हणाले, "आम्ही मोहर्रम आणि कावड यात्रेसाठी सर्व व्यवस्था केल्या आहेत. सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत. संबंधित सर्व घटकांशी (stakeholders) आमची बैठक झाली आहे. अंतर्गत विभागीय समन्वयही साधला आहे. ताजिएच्या मार्गांची तपासणी केली असून, येणाऱ्या अडचणी दूर केल्या आहेत. मोहर्रमची मिरवणूक यशस्वी व्हावी, अशी आमची इच्छा आहे."

कावड यात्रेची तयारी
त्यांनी पुढे सांगितले की, कावड यात्रा ११ जुलैपासून सुरू होईल आणि ती यशस्वी करण्याचे आमचे ध्येय आहे. "मुरादाबादमध्ये दोन महत्त्वाचे मार्ग आहेत. या दोन्ही मार्गांसाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. भाविक हरिद्वार आणि गढमुक्तेश्वर येथून येतात. आम्ही 'एनएचएआय' (NHAI) सोबत बैठक घेतली आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांसोबतही बैठक झाली आहे. यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. ताजिए आणि कावड यात्रेच्या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत," असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

ड्रोनचा वापर आणि कडक कारवाईचा इशारा
अंधार असलेल्या ठिकाणांची ओळख पटवली आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून व्यवस्था केल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. "आम्ही ड्रोनचाही वापर करू. कावड यात्रेकरूंची, विशेषतः सोमवारसह तीन दिवसांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी ड्रोन खूप उपयुक्त ठरतात. 

मोहर्रमची मिरवणूक ६ जुलै रोजी आहे, आणि कोणीही कोणतीही समस्या निर्माण करू नये यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करू. नियमांचे उल्लंघन झाल्यास, आम्ही कठोर कारवाई करू. कोणीही समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह संदेश पोस्ट केल्यास, कठोर कारवाई केली जाईल. दोन्ही उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या आहेत," असे ते म्हणाले.

मोहर्रम आणि कावड यात्रेचे महत्त्व
मोहर्रमचे शिया मुस्लिमांसाठी मोठे धार्मिक महत्त्व आहे. भारतात, ७ ते ८ कोटी शिया मुस्लिम समुदाय, इतर धर्मांच्या लोकांसह, मोठ्या मिरवणुकांमध्ये आणि ताजियामध्ये भाग घेतात. कावड यात्रेत, कावडिये नद्यांमधून पाणी गोळा करतात आणि शेकडो किलोमीटर वाहून नेऊन भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये अर्पण करतात. हिंदू धर्मानुसार, परशुराम, जे शिवाचे भक्त आणि भगवान विष्णूंचे अवतार होते, त्यांनी सुरुवातीच्या मिरवणुकीत भाग घेतला होता. देशभरातील भाविक भगवान शंकराला समर्पित पूजा, उपवास आणि तीर्थयात्रा करतात.