तुम्ही जर गुगल पे (Google Pay), फोनपे (PhonePe), पेटीएम (Paytm) किंवा इतर कोणत्याही यूपीआय (UPI) ॲपचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या १ ऑगस्टपासून यूपीआय संदर्भात पाच मोठे बदल लागू होणार आहेत. या बदलांमुळे तुम्ही डिजिटल पेमेंट कसे करता आणि कोणत्या सेवा वापरता, यावर थेट परिणाम होणार आहे. या बदलांमध्ये काही नियमांमध्ये सूट, तर काही व्यवहारांवर शुल्क लागू होणार आहे.
१ ऑगस्टपासून लागू होणारे ५ प्रमुख नियम :
यूपीआय ऑटोपे मर्यादा वाढणार: यूपीआय ऑटोपेसाठी असलेली १५ हजार रुपयांची मर्यादा आता १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे म्युच्युअल फंड, विमा प्रीमियम, एसआयपी आणि क्रेडिट कार्ड पेमेंटसारख्या मोठ्या आवर्ती (Recurring) पेमेंटसाठी ऑटोपे सेट करणे सोपे होईल.
क्रेडिट कार्डने यूपीआय पेमेंटवर शुल्क: क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या यूपीआय व्यवहारांवर काही विशिष्ट परिस्थितीत शुल्क लागू होणार आहे. दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यावसायिक व्यवहारांसाठी १.१ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) शुल्क आकारले जाईल.
एचडीएफसी बँकेच्या 'पेझॅप'मध्ये बदल: एचडीएफसी बँकेच्या 'पेझॅप' (PayZapp) ॲपवरील 'रेफर आणि अर्न' (Refer and Earn) कार्यक्रम बंद केला जाईल.
एअरटेल पेमेंट बँकेची सेवा बंद: एअरटेल पेमेंट बँक आपल्या ॲपवरील 'इन्स्टंट मनी ट्रान्सफर' (Instant Money Transfer) ही सेवा १ ऑगस्टपासून बंद करणार आहे.
ॲक्सिस बँकेच्या एफडी दरात बदल: ॲक्सिस बँक आपल्या मुदत ठेवींवरील (Fixed Deposit) व्याजदरात बदल करणार आहे.
हे नवे नियम कोट्यवधी डिजिटल वापरकर्त्यांवर परिणाम करतील. त्यामुळे १ ऑगस्टपासून हे बदल लक्षात घेऊनच आर्थिक व्यवहार करणे महत्त्वाचे आहे.