पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांचे भारताला अण्वस्त्रांची धमकी देणारे विधान सडकछाप स्वरुपाची असल्याची टीका 'एमआयएम'चे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली. भारताने असीम मुनीर यांच्या विधानाचा निषेध करून अमेरिकेकडे हा मुद्दा जोरकसपणाने उपस्थित करावा, अशी मागणीही ओवेसी यांनी या वेळी केली.
पाकिस्तान लष्करप्रमुखांची भाषा आणि भारताला ते ज्या धमक्या देत आहेत, ते निंदनीय आहे. भारत हा अमेरिकेचा आणि त्या रणनीतिक भागीदार आहे भारताला अण्वस्त्राच्या धमक्या देत आहेत आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे. असीम मुनीर एखाद्या सडकछाप माणसासारखी भाषा बोलत आहेत. त्यावर केवळ परराष्ट्र मंत्रालयाने वक्तव्य करून चालणार नाही तर नरेंद्र मोदी सरकारने राजकीय उत्तर दिले पाहिजे, असे मत व्यक्त करणारे गिट ओवेसी यांनी केले. भारताला संरक्षण खर्चात वाढ करावी लागेल, असेही खासदार ओवेसी यांनी म्हटले आहे.
'ते' सुटाबुटातील लादेन : रुबिन
पाकिस्तानचे सुष्करप्रमुख असीम लादेन आहेत, अशी टीका अमेरिकेच्या संरक्षण खात्यातील माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी केली आहे. मुनीर यांचे भाषण ऐकताना इस्लामिक स्टेटची आठवण होते. अण्वस्त्राचा वापर करण्याची धमकी दिल्यानंतर वास्तविक पाहता मुनीर यांना बैठकीतून हाकलून द्यायला हवे होते, असे मतही रुबिन यांनी व्यक्त केले. ज्या पद्धतीने पाकिस्तान उघडपणे अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत त्यावरून त्यांनी एक कायदेशीर राष्ट्र म्हणून स्वतःचीच वैधता गमावली आहे, असे रुबिन म्हणाले.