फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांचं मंगळवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत झालं आहे. राष्ट्रपती भवन संकुलात पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या त्यांचे स्वागत केलं आहे.
राष्ट्राध्यक्ष मार्कोस, प्रथम महिला लुईस अरानेटा मार्कोस आणि अधिकृत शिष्टमंडळासह, सोमवारी नवी दिल्लीत आले आहेत. भारतातील त्यांच्या पाच दिवसीय दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी ते अनेक कार्यक्रमांत सहभागी होतील. फिलिपाइन्स प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ही त्यांची भारतातील पहिली भेट आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी सांगितलं आहे.
राष्ट्रपती भवन संकुलाच्या प्रांगणात झालेल्या औपचारिक स्वागतादरम्यान त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांची भेट घेतली आहे.