पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी साबरमती रिव्हरफ्रंट आणि गुजरातमधील केवडिया येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला दिलेल्या भेटीचे स्वागत केले आहे. या भेटीबद्दल त्यांनी कौतुकही केले.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी म्हटले की, "काश्मीर ते केवडिया! श्री ओमर अब्दुल्ला यांना साबरमती रिव्हरफ्रंटवर धावण्याचा आनंद घेताना आणि 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट देताना पाहून चांगले वाटले. त्यांची 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' भेट हा एक महत्त्वाचा संदेश आहे, जो एकतेची भावना दर्शवतो आणि आपल्या देशबांधवांना भारतातील विविध भागांना भेट देण्यास प्रेरित करेल."