पंतप्रधान मोदींनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अशी वाहिली आदरांजली

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 Months ago
पंतप्रधान मोदी आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे संग्रहित छायाचित्र
पंतप्रधान मोदी आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे संग्रहित छायाचित्र

 

नवी दिल्ली, २७ जुलै

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. डॉ. कलाम हे एक प्रेरणादायी द्रष्टे व्यक्तिमत्व, उत्कृष्ट शास्त्रज्ञ, मार्गदर्शक आणि महान देशभक्त म्हणून स्मरणात राहतील, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

पंतप्रधानांनी 'एक्स' या समाज माध्यमावर एक संदेश लिहिला आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "आपले लाडके माजी राष्ट्रपती, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. राष्ट्रासाठी त्यांनी दिलेले समर्पण अनुकरणीय होते. त्यांचे विचार भारताच्या युवा वर्गाला विकसित आणि सामर्थ्यशाली भारत घडवण्यासाठी योगदान देण्याकरता प्रेरणा देत आहेत."