पंतप्रधान मोदींनी संत कबीर दास यांचे ‘असे’ केले स्मरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 d ago
संत कबीर
संत कबीर

 

नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संत कबीर दास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. समाजातील दुष्प्रवृत्ती दूर करण्यासाठी कबीरांनी दिलेले योगदान नेहमी स्मरणात राहील, असे त्यांनी नमूद केले.

मोदी यांनी हिंदीत X वर एका पोस्टमध्ये लिहिले की, संत कबीर दास यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक सौहार्दासाठी वाहिले. त्यांच्या दोह्यांमध्ये शब्दांची साधेपणा आहे, पण भावनांची खोलीही आहे. त्यामुळे आजही त्यांचा भारतीय मनावर खोल प्रभाव आहे. समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्यात त्यांचे योगदान आदराने स्मरणात राहील. 
पंतप्रधानांनी यापूर्वी विविध प्रसंगी संत कबीर यांना अभिवादन केल्याचे आणि त्यांच्या शिकवणींवर बोलल्याचे व्हिडीयोही शेअर केले. पंधराव्या शतकातील कबीरांच्या कवितांनी नैतिकता आणि जीवन जगण्याचे धडे देत समाजातील दुष्प्रवृत्तींवर प्रहार केला. त्यांचा प्रभाव आजही कायम आहे.

संत कबीर हे भक्ती चळवळीचे अग्रदूत होते. त्यांनी आपल्या दोह्यांद्वारे जातीपातीच्या भेदांना आव्हान दिले आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही परंपरांना एकत्र आणत त्यांनी साध्या भाषेत सत्य आणि प्रेमाचा मार्ग दाखवला. त्यांच्या शिकवणी आजही सामाजिक एकता आणि शांततेसाठी प्रेरणा देतात.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter