पंतप्रधान मोदी आणि यूएई अध्यक्षांमध्ये संबंध दृढ करण्यावर भर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. दोन्ही देशांतील जनतेच्या परस्पर फायद्यासाठी सहकार्य आणखी विकसित आणि दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला, असे एका निवेदनात गुरुवारी (३१ जुलै) म्हटले आहे.

दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवरून बोलताना भारत आणि यूएई यांच्यातील द्विपक्षीय 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' (Comprehensive Strategic Partnership) आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या परस्पर वचनबद्धतेची पुष्टी केली.

त्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचे सकारात्मक मूल्यांकन केले. दोन्ही देशांतील जनतेच्या परस्पर फायद्यासाठी सहकार्य आणखी विकसित आणि दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.

शेख मोहम्मद यांनी मोदींचे भारतात सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेल्या दुसऱ्या व्यक्ती बनल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी मोदींना देशासाठीच्या त्यांच्या सेवेत सातत्यपूर्ण यशासाठी शुभेच्छाही दिल्या, असे निवेदनात म्हटले आहे.