१९४०चे दशक भारतीय इतिहासिक घडामोडींनी भरलेले होते. बंगालमध्ये मानवनिर्मित दुष्काळात लाखो लोक मरण पावले. फाळणीच्या परिणामांमुळे लाखो लोक मारले गेले किंवा विस्थापित झाले. देशाची धार्मिक रेषांवर फाळणी झाली. आझाद हिंद फौजेच्या पराक्रमाने आणि भारत छोडो आंदोलनाने ब्रिटिशांना लवकरच भारत सोडावा लागला. नव स्वतंत्र राष्ट्राला, विशेषतः अस्थिर काळात नायकांची गरज होती. ही आहे १९४० च्या दशकातील भारतातील पाच युवा आदर्शांची माझी निवड.
ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान :
मोहम्मद अली जिन्नांनी एका मुस्लीम अधिकाऱ्याला पाकिस्तान सैन्यात लष्करप्रमुख होण्याची ऑफर दिली, परंतु त्यांनी ती नाकारली. यापेक्षा चांगला भारतीय तरुणांसाठी मुस्लिम सैन्य अधिकारी दुसरा कुणी असूच शकत नाही. १९४८ मध्ये पाकिस्तानने त्यांच्यावर ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. परंतु त्या अधिकाऱ्यानेही शत्रूचा पराभव होईपर्यंत जमिनीवर झोपण्याची शपथ घेतली होती. त्यांनी मुलांचा गट तयार करून सैन्याला मदत केली. युद्धभूमीवर त्यांनी प्राण सोडले, पण त्याआधी नौशेरा जिंकला.
ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांनी १९४७ च्या अखेरीस आणि १९४८ मध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय सैन्याचे नेतृत्व केले.
३ जुलै १९४८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला, पण त्याआधी त्यांना सेलिब्रिटीचा दर्जा मिळाला. त्यांना महावीर चक्र प्रदान झाले. ६ फेब्रुवारी १९४८ रोजी पाकिस्तानने ११,००० सैनिकांसह नौशेरावर दोन बाजूंनी हल्ला केला. भारतीय सैनिकांची संख्या कमी होती, पण त्यांचे मनोबल उंच होते.
सैन्य पोहोचेपर्यंत एका राजपूतच्या दुसऱ्या पिकेटने, तैनधार येथील एका तळावर कंबर कसून धैर्य दाखवले. या तळावरील २७ सैनिकांपैकी २६ जणांनी प्राण गमावले. नाईक जदुनाथ सिंग यांना या संरक्षणाचे नेतृत्व केल्याबद्दल मरणोत्तर परमवीर चक्र मिळाले.
दिवसअखेरीस भारतीयांनी २,००० शत्रू सैनिकांना ठार केले, तर स्वतःचे ३३ सैनिक गमावले. हा निर्णायक विजय होता. यामुळे उस्मान भारतात जननायक बनले.
पाकिस्तानने त्यांच्यावर ५०,००० रुपयांचे बक्षीस ठेवले होते. उस्मान यांना ‘नौशेरा का शेर’ म्हणून संबोधलं गेले. पाकिस्तानच्या हल्ल्यात ३ जुलै १९४८ मध्ये २५ पौंडरच्या गोळ्याने उस्मान यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान, गव्हर्नर जनरल, संरक्षणमंत्री आणि संविधान सभेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
होमी जहांगीर भाभा :
१९३० मध्ये सी.व्ही. रमण यांना पहिले नोबेल पारितोषिक मिळाले, पण वैज्ञानिक तंत्रज्ञानाला राष्ट्राचे स्वप्न बनवण्याचे श्रेय होमी जहांगीर भाभा यांना मिळते. इतर महान शास्त्रज्ञांपेक्षा त्यांना वेगळे ठरवले ते त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व आणि प्रशासकीय कौशल्य. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस भाभा शिक्षित भारतीयांमध्ये घराघरातले नाव बनले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अॅडम्स प्राइझ मिळवणारा हा भारतीय आदर्श व्हायचा होता.
वयाच्या ३२व्या वर्षी सी.व्ही. रमण यांनी त्यांना 'आधुनिक लिओनार्दो दा विंची' म्हटले गेले होते. १९४३ मध्ये, वयाच्या ३४ व्या वर्षी, भाभा यांनी जे.आर.डी. टाटांना भारतात संशोधन संस्था उभारण्यासाठी पत्र लिहिले. यातून टीआयएफआरची स्थापना झाली आणि भारतीय अणुकार्यक्रमाचा पाया घातला गेला.
स्वातंत्र्यानंतर भाभा यांनी नेहरूंना अणुऊर्जा विकासासाठी अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. भारतात त्यानंतर फार कमी शास्त्रज्ञांना अशी लोकप्रियता मिळाली. जी मिळाली, ती त्यांच्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर.
कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन :
ज्या काळात भारतीय मुलींना शाळेत जाण्याची, नोकरी करण्याची परवानगी नव्हती आणि त्यांना कमी लेखले जायचे, त्या काळात एका महिला सैन्य अधिकाऱ्याने प्रसिद्धी मिळवली. तिची लोकप्रियता रणभूमीवर राणी लक्ष्मीबाईशीच तुलना करता येईल. १९१४ मध्ये मलबारमध्ये जन्मलेल्या लक्ष्मी स्वामिनाथन यांनी १९३८ मध्ये मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. त्या सिंगापूरला गेल्या.
त्यांनी जपानने ताब्यात घेतलेल्या भारतीय सैनिकांची सेवा केली. नंतर त्या सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेत (आयएनए) सामील झाल्या. त्यांनी राण ी झाशी रेजिमेंटचे नेतृत्व केले. युद्धानंतर आयएनए सैनिकांवर खटले चालले, तेव्हा कॅप्टन लक्ष्मी आयएनएचं प्रतिनिधित्व करणारा प्रमुख चेहरा बनल्या. त्यांच्या मुलाखती सर्व प्रमुख वृत्तपत्रांत छापल्या गेल्या. त्यांना सार्वजनिक सभांना संबोधनासाठी बोलावले जायचे. आयएनए कैद्यांच्या समर्थनार्थ मोर्चांमध्ये त्यांचे फोटो झळकले. युद्धानंतरच्या काळात त्या शिक्षित आणि निधड्या भारतीय महिलांचे स्वप्न बनल्या.
नौशाद :
२६ वर्षीय संगीतकाराची लोकप्रियता कशी मोजाल? २३ वर्षीय गायिका त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत येते. ती दुसऱ्या कोणत्याही संगीतकारासोबत गाणार नाही. तिला त्याच्यासोबत काम न करता आलं तर आत्महत्या करेन, असं ती म्हणते. हा संगीतकार होता नौशाद. गायिका होती उमा देवी, जी टुन टुन नावाने प्रसिद्ध होती. ही गोष्ट आहे १९४६ ची.
नौशाद, भारतातील पहिला सुपरस्टार संगीतकार, १९४४ मध्ये ‘रतन’ चित्रपटानंतर तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. तो सर्वात जास्त मानधन घेणारा संगीतकार बनला. त्याने सर्व अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेतलं. भारतातील तरुण त्याच्यासोबत काम करण्याच्या आशेने मुंबईत धाव घेत होते. त्यावेळी मोहम्मद रफी हे आणखी एक तरुण होते, जे पंजाबमधून नौशादसोबत काम करण्यासाठी आले.
विजय मर्चंट :
१९३० च्या दशकात विजय मर्चंट यांनी ‘बॉम्बे स्कूल ऑफ बॅट्समन्सिप’चा पाया घातला. यातून सुनील गावसकर, दिलीप सरदेसाई, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर यांसारखे खेळाडू मिळाले. खरा देशभक्त असलेल्या विजय यांनी १९३२ मध्ये गांधीजींच्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे इंग्लंडला जाणाऱ्या पहिल्या कसोटी संघातून आपले नाव काढले. त्यांचा प्रथम श्रेणी सरासरी फक्त डॉन ब्रॅड मनच्या मागे आहे. त्यांच्या खेळण्याच्या शैलीने अनेक भारतीय तरुणांना फलंदाजी स्वीकारण्यास प्रेरणा दिली.
१९४० च्या दशकात तरुण त्यांच्यासारखी फलंदाजी करून भारताचे प्रतिनिधित्व करू इच्छित होते. यातून एक परंपरा सुरू झाली, ज्याने भारताच्या क्रिकेट संघात नेहमीच उत्तम फलंदाज मिळाले. त्यांनी फक्त १० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले. स्वातंत्र्यलढा, दुसरे महायुद्ध आणि तंदुरुस्तीमुळे ही संख्या कमी राहिली. पण त्यांची ४७ पेक्षा जास्त सरासरी त्यांचा दर्जा दाखवते. ११ प्रथम श्रेणी द्विशतकांचा भारतीय विक्रम ६० वर्षांहून अधिक काळ टिकला. विजय मर्चंट हे एक कारण होतं ज्यामुळे भारतीयांनी गोलंदाजीपेक्षा फलंदाजीला पसंती दिली.