जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे गजलगायक पंकज उधास यांनी गायलेली अनेक गाणी, गजल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. पंकज उधास यांनी गजलगायकीच्या क्षेत्रात स्थान निर्माण केले. 'चिठ्ठी आयी है...' ही त्यांची गजल अजरामर होती, आहे आणि राहील यात काही शंकाच नाही. 'चांदी जैसा रंग हे तेरा सोने जैसे बाल..' ही गझल ऐकून तर एक पिढी मोठी झाली. या प्रकारचं प्रेम व्यक्त करणारी गजल असो किंवा 'चिठ्ठी आयी है..' सारखी विराणी असो... त्यासाठी पंकज उधास हे कायमच स्मरणात राहतील. ते 'शान-ए-गझल' असेच होते.
पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमधील जेतपूरमध्ये झाला. केशुभाई उधास आणि जितुबेन उधास हे त्यांच्या आई- वडिलांचे नाव. त्यांचे मोठे भाऊ मनहर उधास यांनी बॉलिवूडमध्ये हिंदी पार्श्वगायक म्हणून यश मिळवले. त्यांचे दुसरे मोठे भाऊ निर्मल उधास हे गजलगायक आहेत. पंकज उधास यांनी सर बीपीटीआय भावनगरमध्ये शिक्षण घेतले होते. पंकज उधास लहान असताना त्याचे वडील दिलरुबा हे तंतुवाद्य वाजवत असत.
उधास भावंडांची संगीतातील आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना राजकोट येथील संगीत अकादमीमध्ये दाखल केले. त्यांनी सुरुवातीला तबला शिकण्यासाठी स्वत:ची नोंदणी केली; पण नंतर गुलाम कादीर खान साहेब यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर उधास ग्वाल्हेर घराण्याचे गायक नवरंग नागपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले. चार वर्षांनंतर ते राजकोटच्या संगीत नाट्य अकादमीत दाखल झाले आणि त्यांनी तबला वाजविण्याचे बारकावे शिकले.
त्यांनी विल्सन कॉलेज आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेज येथे विज्ञान शाखेची पदवी घेतली आणि मा. नवरंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण सुरू केले. त्यांचे पहिले गाणे उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेले आणि नक्ष लायलपुरी यांनी लिहिलेले 'कामना' चित्रपटातील एकल गाणे होते. चित्रपट फ्लॉप ठरला पण त्यांच्या सादरीकरणाचे खूप कौतुक झाले. त्यांनतर त्यांना गजलची आवड निर्माण झाली आणि गजलगायक म्हणून करिअर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ते उर्दू शिकले. पहिला गजल अल्बम 'आहट' १९८० मध्ये प्रसिद्ध झाला.
संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांच्या गझलगायकीची दाखल घेत, २००६ साली भारत सरकारने त्यांना भारतातील चौथा प्रतिष्ठित पुरस्कार पद्मश्री ने गौरविण्यात
अजरामजर 'चिठ्ठी आयी है'
१९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाम' या चित्रपटातील 'चिठ्ठी आयी है' या गाण्याने तर त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. हे गाणे रसिकांना इतके आवडले की हे गाणे ऐकताना अनेकांचे डोळे भरून येत असत. या गाण्याप्रमाणेच साजन, घायल, ये दिल्लगी, मोहरा या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांना प्रसिद्धी मिळाली. २०११ पर्यंत त्यांनी पन्नासपेक्षा जास्त अल्बम आणि अनेक गाणी रिलीज केली. त्यांनी जगभरातील असंख्य मैफिली आणि संगीत महोत्सवामध्ये सादरीकरण केले आहे. संगीतातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक 'पद्मश्री' सह अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. गजलला महत्त्व मिळवून देण्यात जगजित सिंह, तलत अजीज यांच्यासोबतच पंकज उधास यांचाही सिंहाचा वाटा होता.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Channel
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter
पंकज उधास यांच्या गझल गायकीची दाखल घेत, २००६ साली भारत सरकारने त्यांना भारतातील चौथा प्रतिष्ठित पुरस्कार पद्मश्री ने गौरविण्यात आले होते.
पंकज उधास यांच्या गझल गायकीची दाखल घेत, २००६ साली भारत सरकारने त्यांना भारतातील चौथा प्रतिष्ठित पुरस्कार पद्मश्री ने गौरविण्यात आले होते.