पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान ट्रूडो आणि श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी
भारतावर बिनबुडाचे आरोप केल्याने कॅनडाची आता कोंडी होत आहे. आता श्रीलंकेनेही भारताला पाठिंबा दिला आहे. भारत-कॅनडा वादावर श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी भारताला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, काही दहशतवाद्यांना कॅनडामध्ये सुरक्षित आश्रय मिळाला आहे. ट्रूडो यांनी श्रीलंकेबाबत असेच म्हटले होते की, श्रीलंकेत भयंकर हत्याकांड घडले होते, ते पूर्ण खोटे होते, असंही ते म्हणाले आहेत.
साबरी म्हणाले की, काल मी पाहिले की ट्रूडो नाझींशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीचे स्वागत करत होते. हे संशयास्पद आहे आणि आम्ही यापूर्वीही त्यावर कारवाई केली आहे. काही वेळा पीएम ट्रूडो अपमानजनक आरोप करतात याचे मला आश्चर्य वाटत नाही, असंही ते पुढे म्हणाले आहेत.
त्याच वेळी, भारतातील श्रीलंकेच्या निवर्तमान उच्चायुक्त मेलिंडा मोरागोडा यांनी सांगितले की, कॅनडाच्या आरोपांना भारताने दिलेली प्रतिक्रिया अत्यंत कठोर आणि कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता आहे. या प्रकरणी श्रीलंकेने भारताला पाठिंबा दिला आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, दहशतवादामुळे श्रीलंकेतील लोकांचे नुकसान झाले आहे आणि त्यांच्या देशाची दहशतवादाबाबत शून्य सहनशीलता आहे.
भारतावर कॅनडाच्या आरोपांबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारताची प्रतिक्रिया खूप तीव्र आहे. आम्ही भारताला पाठिंबा देतो. आता मी ६० वर्षांचा आहे, आम्ही माझ्या आयुष्यातील ४० वर्षे श्रीलंकेत विविध प्रकारच्या दहशतवादाचा सामना करत घालवली आहेत.दहशतवादामुळे मी अनेक मित्र आणि सहकारी गमावले आहेत. दहशतवादामुळे श्रीलंकेतील अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या विषयांवर आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे.
त्याचबरोबर शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येचा कॅनडाचा तपास पुढे सरकावा आणि गुन्हेगारांना शिक्षा द्यावी, असे अमेरिकेने म्हटले आहे. निज्जर यांच्या हत्येमागे भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की (कॅनडाचे) पंतप्रधान ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांमुळे आम्ही चिंतित आहोत. आम्ही कॅनेडियन सहकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. ही एक महत्त्वाची घटना आहे, असे आम्हाला वाटते. कॅनडाचा तपास पुढे सरकावा आणि गुन्हेगारांना न्याय मिळायला हवा. आम्ही सार्वजनिक आणि खाजगीरित्या भारत सरकारला कॅनडाच्या तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
निज्जर यांच्या हत्येनंतर उडाली खळबळ
कॅनडात खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंह निज्जर गोळीबारात ठार झाला, कॅनडाचे पीएम जस्टिन ट्रूडो यांनी यामागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. निज्जर हा भारताने घोषित केलेला दहशतवादी होता. १८ जून रोजी कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर त्यांची हत्या करण्यात आली होती. तर त्याच्या हत्येचा आरोप भारताने फेटाळून लावले आहेत.
'भारत सरकारच्या सहभागाचे आरोप मूर्खपणाचे'
परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कॅनडाच्या पंतप्रधानांचे विधान आम्ही त्यांच्या संसदेत पाहिले आहे आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांचे विधानही फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकार हे विधान करणार नाही. कॅनडामधील हिंसाचाराच्या कोणत्याही कृत्यासाठी भारत जबाबदार नाही. भारताच्या सहभागाचे आरोप हास्यास्पद आहेत