जगभारत अजमेर शरीफ या नावाने सुलतानुल हिंद हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलेह यांची दर्गा प्रसिद्ध आहे. नुकत्याच या दर्गेच्या ८१३ व्या उर्साची सुरुवात ध्वजारोहणाचा विधी ( परचम कुशाई) करून झाली. भीलवाडा येथील गौरी खानदानाने ध्वजारोहणाचा विधी बुलंद दरवाजावर येथे केला. या विधीवेळी मौरूसी अमला आणि दर्गा कमिटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुघलिया परंपरेनुसार २५ तोफांच्या सलामीसह ध्वजविधीचा जुलूस दर्गा गेस्ट हाऊसपासून सुरू झाला. ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्साच्या ध्वजविधीसाठी सगीर येथून झायरीं अजमेरमध्ये आले होते.
या दरम्यान मोठ्या संख्येने भक्तगण प्रार्थना करताना दिसले. ध्वजविधी केल्यानंतर उर्साची विधिवत सुरूवात रज्जबच्या (इस्लामिक कैलेंडर का सातवां महीना) चंद्राच्या दर्शनानंतर केली जाईल. तसेच आणि आज दि. ३१ डिसेंबरला शाही संदलाचा विधी पूर्ण होईल. हा विधी पूर्ण झाल्यानंतर उद्या १ जानेवारीला जन्नती दरवाजा उघडला जाईल. ख्वाजा साहबाचा वार्षिक उर्स मुबारक दि. १० जानेवारीपर्यंत चालेल.
भक्तांनी त्यांच्या मन्नतीसाठी (इच्छा पूर्ण होण्यासाठी केलेली प्रार्थना) घेतले ध्वजाचे दर्शन
गरीब नवाज यांच्या ध्वजविधीचा जुलूस असरच्या (५:३० ची नमाज ) नमाजेनंतर गरीब नवाज गेस्ट हाऊसपासून रवाना झाला. या जुलूसमध्ये अनेक मोठे कव्वाल (कव्वाली म्हणणारे) आणि बॅंड बाजे होते. कव्वाल आणि बॅंड बाजांसोबत जुलूस लंगरखाना गली, निजाम गेट मधून दर्गाच्या मुख्य दरवाज्या म्हणजे निजाम गेटमधून आत आला. जुलूस पोहोचताच निजाम गेटवर शादियाने ( उत्सवानिमित्त संगीत वाजवणे/ आनंद साजरा करणे.) वाजले. या विधीवेळी भक्तांनी त्यांच्या मन्नतीसाठी ख्वाजा गरीब नवाज यांच्या ध्वजाचे दर्शन घेतले.
भीलवाडा येथील गौरी कुटुंबाने काय म्हटले?
भीलवाडा येथून आलेल्या गौरी कुटुंबातील सदस्य म्हणाले, “ध्वजारोहण करण्याची परंपरा खूप काळापासून सुरू आहे. १९२८मध्ये फखरुद्दीन गौरी यांच्या पीर मुर्शिद अब्दुल सत्तार बादशाह यांनी ही परंपरा सुरू केली होती. त्यानंतर १९४४पासून त्यांच्या आजोबांना लाल मोहम्मद गौरी यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचे निधन झाल्यानंतर १९९१पासून त्यांचा मुलगा मोईनुद्दीन गौरी यांनी ही परंपरा चालू ठेवली होती. त्यानंतर २००७ पासून फखरुद्दीन यांनी ही परंपरा चालू ठेवली आहे.”
पुढे ते म्हणतात, “ध्वजाचा विधी पूर्ण झाल्यानंतर ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गेचा ध्वज दूर-दूरच्या गावांमध्ये दिसत असे. त्या वेळी घरं छोटी होती. त्यामुळे बुलंद दरवाजा खूप दूरून दिसत असे. दरवाज्यावर ध्वज पाहून लोकांना समजायचे की पाच दिवसांनंतर गरीब नवाज का उर्स सुरू होणार आहे.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter