ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काय घडलं?; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 6 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे दोन्ही देशांमधील मैत्री वाढेल, अशी चर्चा आहे. जपानपासून सुरू झालेल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियात होते. नरेंद्र मोदी यांचे ऑस्ट्रेलियात जल्लोषात स्वागत करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी स्वागताचे काही क्षण शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) सिडनी येथे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचीही भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि संरक्षण यासह इतर मुद्द्यांवर मोदी यांनी चर्चा केली.

 

नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते म्हणाले,  पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी फलदायी चर्चा झाली. एका ऐतिहासिक सामुदायिक कार्यक्रमापासून ते व्यावसायिक नेत्यांच्या भेटी झाल्या. विविध क्षेत्रातील मान्यवर ऑस्ट्रेलियन लोकांशी संवाद साधला, ही एक महत्त्वाची भेट होती. जी भारतासोबतच्या मैत्रीला बळ देईल.


 

पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सिडनीचे स्वरूप बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल अँथनी अल्बानीज यांच्यासह ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी आयोजिक एका भव्य कार्यक्रमात सहभागी झाले होते . या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी  मोदींना 'द बॉस' म्हटले आणि त्यांच्या लोकप्रियतेची तुलना महान रॉकस्टार ब्रुस स्प्रिंग्स्टीनशी केली.


"मी शेवटच्या वेळी ब्रूस स्प्रिंगस्टीनला या मंचावर पाहिले होते. मात्र पंतप्रधान मोदींचे जसे भव्य स्वाग झाले तसे त्यांचे झाले नव्हते. पंतप्रधान मोदी हे बॉस आहेत. गेल्या वर्षी भारत आणि ऑस्ट्रेलियाने आर्थिक सहकार्य व्यापार करार (ECTA) ला अंतिम रूप दिले आणि तो डिसेंबरमध्ये लागू झाला. दोन्ही बाजू आता सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावर (CECA) काम करत आहेत," असे अल्बानीज यांनी स्पष्ट केले.