हिमाचलमध्ये भूस्खलन, क्षणात घरे जमीनदोस्त; थरकाप उडवणाऱ्या घटना कॅमेऱ्यात कैद

Story by  test | Published by  Pooja Nayak • 8 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पावसामुळे डोंगर उतारावारील माती खचून घरे मातीखाली गाडली गेल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. दोन झोप उडवणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, पहिल्या व्हिडिओमध्ये तीव्र डोंगरउतारावरील घर पावसामुळे भूस्खलन होऊन जमीनदोस्त झाल्याचं दिसत आहे. तर घर कोसळत असताना दुसऱ्या घरातील नागरिक आरडाओरड करताना दिसत आहेत. घर कोसळल्यानंतर बाजूला असलेल्या लोकांना घटनास्थळावरून दूर जाण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. हा धक्कादायक व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये डोंगर उतारावरून वाहणारे पुराचे पाणी घरात घुसल्याचं दिसत आहे. तर या पुराच्या पाण्यामध्ये डोंगर उतारावरील मलबा वाहत आहे. घरात पाणी शिरल्यामुळे अख्खं घर कोसळून पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. तर हे थरारक दोन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

या घटनेमुळे आणि मुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.