आता Instagram वर तुम्हीही मिळवू शकता ब्लू टिक!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
instagram- ब्लू टिक
instagram- ब्लू टिक

 

हल्ली ब्लू टिक मिळवण्याचं आणि आपलं अकाउंट व्हेरीफाईड करण्याचं क्रेझ सगळीकडे सुरू आहे. अशाच ट्वीटर फेसबूकवर सुरवातीला अनेक लोकांनी अकांउट व्हेरीफाइड करत ब्लू टिक मिळवल्या मात्र आता ट्वीटरवर ब्लू टिक संदर्भात अनेक नियमावली आलेल्या आहेत पण तुम्ही सर्वात जास्त वापरणाऱ्या इंस्टाग्रामवरही ब्लू टिक मिळवू शकता. 

 

मागील शुक्रवारी ट्विटरने घोषणा केली होती की १ एप्रिलपासून लेगेसी वेरीफाय प्रोग्रामला बंद करणार आणि केवळ शुल्क भरणारे कस्टमर्स आणि संघटनांच्या सदस्यांनाच ब्लू टिक ठेवण्याची परवानगी असेल. म्हणजेच आता तुमच्या ट्विटरवरील ब्लू टिकसाठी पैसे लागणार.

 

पण तुम्ही इंस्टाग्रामवरही ब्लू टिक मिळवू शकता. आज आपण त्याच्या सोप्या स्टेप्स फॉलो करणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

 

Instagram प्रोफाइलवर वेरिफाइड ब्लू टिक त्या व्यक्तीच्या किंवा ब्रँडच्या प्रामाणिकतेची ओळख असते. मेटानुसार निळ्या बॅज चा उद्देश लोकांना हे सांगणे आहे की अकाउंट तपासणे आणि वेरीफाय करणे. चला या विषयी सविस्तर जाणून घेऊया.

 

प्रत्येक व्यक्तीला केवळ एक पेज किंवा प्रोफइल उघडण्याची परवानगी आहे. जर तुम्ही नियमावली बसता तर तुम्ही वेरिफिकेशन अँड्रॉइड किंवा आयओएस  हूनही करू शकता.

 

या स्टेप्स फॉलो करा

सर्वात आधी तुम्हाला ज्या अकाउंटवर ब्लू टिक हवंय ते लॉग इन करावं

त्यानंतर उजव्या बाजूला वर अनेक ऑप्शन देण्यात येणार. त्यानंतर सेटिंग्स आणि प्रायव्हसीमध्ये जा

त्यानंतर रिक्वेस्ट वेरिफिकेशन नंतर अकाउंटवर क्लिक करा.

स्वत:चं पुर्ण नाव टाका आणि गरजेची माहिती द्या.

ऑन-स्क्रीन नियमांना फॉलो करा आणि नंतर सबमिट बटन दाबा.