उन्हाळ्यात उष्माघातापासून 'असा' करा बचाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

उन्हाचा चटका वाढला असून, आठवडाभरात तापमानात चार अंशांची वाढ झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक कमाल आणि किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान ३९.५ तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस होते.

उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तीव्र उन्हात फिरणे टाळा, भरपूर पाणी प्या, थकवा येणे, मळमळ होणे, ताप येणे असा त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरू करणे आवश्यक आहे.

कशामुळे होऊ शकतो उष्माघात?
 • तीव्र उन्हात शारीरिक श्रमाची, कष्टाची कामे बराचवेळ करणे
 • कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये तासनतास काम करणे
 • जास्त तापमानाच्या खोलीमध्ये खूप वेळ काम करणे
 • जीन्ससारख्या घट्ट कपड्यांचा नियमित वापर करणे
 • वाढत्या तापमानाशी सतत संपर्कामुळे उष्माघात होऊ शकतो
 • कुठलीही काळजी न घेता उन्हात जास्तवेळ फिरणे
 
लक्षणे
 • मळमळ होणे
 • उलटी
 • हात-पायाला गोळे येणे
 • थकवा येणे
 • १०३ पेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्वचित लाल होणे, बराचवेळ अस्वस्थ वाटणे
 • घाम न येणे, चक्कर येणे, खूप वेळ निरुत्साही वाटणे, डोके खूप दुखणे, छातीत बराचवेळ धडधड होणे
 • रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धावस्था

अतिजोखमीच्या व्यक्ती
दहा वर्ष वयापेक्षा कमी वयाची बालके, खेळाडू
सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती
हृदयरोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार असलेले

उपचार
 • उन्हाचा धक्का बसताच रुग्णास प्रथम सावलीत आणावे
 • रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे
 • रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत
 • रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे
 • सुरवातीला चहा, कॉफी देऊ नये
 • रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात
 • थर्मामीटरने रुग्णाचे तापमान ३६.८ सेल्सिअसच्या खाली तापमान होईपर्यंत वरील उपचार करावेत