दाऊदी बोहरा समाजाचे नेते शाहजादा इद्रीस बदरुद्दीन यांचे मुंबईत निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
शाहजादा इद्रीस बदरुद्दीन
शाहजादा इद्रीस बदरुद्दीन

 

मुंबई 

दाऊदी बोहरा समुदायाचे ५३ वे गुरु सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांचे लहान बंधू आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ शाहजादा इद्रीस बदरुद्दीन यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी समाजात शैक्षणिक आणि प्रशासनिक पातळीवर महत्त्वपूर्ण सेवा दिली होती.

शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान

शाहजादा इद्रीस बदरुद्दीन हे दिवंगत सुलताना अल-बोहरा सैयदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे पाचवे पुत्र होते. त्यांच्या आयुष्यात शिक्षण नेहमीच केंद्रस्थानी राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समुदायाच्या जागतिक शाळांचे जाळे विस्तारले आणि विकसित झाले, ज्यातून वेगवेगळ्या देशांमधील हजारो विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. शैक्षणिक मानके बळकट करणे, अभ्यासक्रम विकसित करणे आणि आधुनिक शिक्षण पद्धतींना प्रोत्साहन देण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर समुदाय प्रतिनिधित्व

शिक्षणाशिवाय, शाहजादा बदरुद्दीन यांनी युनायटेड किंगडम, आयर्लंड, स्वीडन आणि नॉर्वेमध्ये सुलताना अल-बोहरांचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी दुबईतील सुलतान अल-बोहरा फाऊंडेशनच्या परिषदेचे सदस्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली. याद्वारे त्यांनी सार्वजनिक अधिकाऱ्यांसोबत संबंध राखत समाजात शांतता, सलोखा आणि सेवाभाव रुजवण्याचा संदेश दिला. त्यांच्या या दिर्घकालीन सेवेमुळे दाऊदी बोहरा समुदायाच्या अनेक पिढ्यांना शैक्षणिक व संस्थात्मक प्रगतीचा लाभ मिळाला आहे.