केरळच्या कलाकाराने व्हीलचेअरवर फिरत केला गिनीज रेकॉर्ड..

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स

 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे इंस्टाग्राम फीड जगभरातील असंख्य विक्रमांच्या फुटेजने भरलेले आहे. या पोस्ट नेहमीच आश्चर्यचकित करणाऱ्या अन् धाडसी असतात, अशात आत्ताच्या नवीन पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. व्हिडिओमध्ये आपण एक व्हीलचेअरवर बसलेला व्यक्ती बघतो, हा इसम दुबईच्या रस्त्यावर फिरत GPS च्या मदतीने एक आकृती रेखटतांना दिसतो आहे.

कोण आहे ही व्यक्ती?

या व्यक्तीचे नाव सुजीथ वर्गीस असून ते आपल्या भारताचे केरळमध्ये राहणारे व्यक्ती आहे. त्यांनी व्हीलचेअरवर फिरत जगातली सर्वात मोठी GPS रेखाकृती सादर केली आहे. त्यांनी व्हीलचेअर बाउंडचा लोगो GPS च्या मदतीने रेखाटला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) नुसार, कलाकार सुजीथ यांनी सर्वात मोठे GPS रेखाचित्र तयार करुन इतिहास रचला आहे. हे रेखाचित्र ८.७१ किलोमीटर (५.४१ मैल) अंतर व्यापते आणि पूर्ण होण्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागला.

२०१३ मध्ये बाईक अपघातानंतर सुजित पॅरॅलिसिसने ग्रस्त झालेले, त्यांच्या सभोवतालच्या जगाचा शोध घेण्याच्या त्याच्या आवडीसोबत कलेची आवड जोडण्याचा एक मार्ग म्हणून GPS रेखाचित्राकडे वळला. त्याने त्याची व्हीलचेअर आणि GPS ट्रॅकर वापरून त्याचा मार्ग काळजीपूर्वक आखला आणि त्याच्या मनात असलेली विशिष्ट प्रतिमा तयार केली.

 

 

 

दुबई पोलिस जनरल कमांडने सुजीथ वर्गीस यांना त्यांच्या विक्रमी कामगिरीमध्ये पाठिंबा दिला, ज्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (GWR) ने त्यांच्या Instagram पेजवर पोस्ट केले. हे अरबी भाषेत लिहिलेले होते, सुजीथच्या कर्तृत्वाचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी कॅप्शन अनुवादित करण्यात आला.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) ला दिलेल्या मुलाखतीत सुजीथ म्हाणाले, सर्वात मोठ्या वैयक्तिक GPS रेखाचित्रासाठी रेकॉर्ड धारक सुजीथ वर्गीस यांनी या कामगिरीबद्दल आपले विचार शेअर केले. अन् समविचारी व्यक्तींच्या जागतिक नेटवर्कच्या वतीने दुबई आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून त्यांनी जगाला संदेश दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.