महिमा ठोंबरे
प्रसिद्ध गायक जावेद अली यांची सूफी संगीताची मैफील पुण्यात रंगणार आहे. यानिमित्त अली यांचा आजवरचा प्रवास, त्यांच्या गायकीमागील विचार, संगीत आणि आरोग्याचे नाते आदींविषयी साधलेला हा संवाद.
उस्ताद गुलाम अली खाँ यांच्या प्रभावामुळे आपण आपले नाव बदलले; पण त्यापलीकडे जात त्यांचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि गायकीवर काय प्रभाव पडला?
लहानपणापासून उस्ताद गुलाम अली खाँ यांच्या गझल ऐकायला मला प्रचंड आवडत असे. तेच माझे या क्षेत्रातील आदर्श होते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीमुळे अतिशय प्रभावित होतात, तेव्हा त्यांच्यातील काही अंश तुमच्या कामात प्रतिबिंबित होतोच; किंबहुना व्हायलाच हवा. त्यामुळे लोकही ज्यावेळी माझ्या गाण्यात गुलाम अली खाँ यांच्या गाण्याची झलक आहे म्हणतात, त्यावेळी मला अतिशय आनंद होतो. माझ्या गळ्यातही ती थोडीफार नैसर्गिक 'फिरत' आहे, काही गाण्यांमध्ये मी त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो.
आपल्याला संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. आपले वडील देखील गायक होते. घरातील संगीताचे वातावरण कसे होते ?
घरात संगीताचे वातावरण असले तरी प्रत्येक व्यक्तीला संगीतात रुची असतेच, असे नाही. तुम्हाला संगीताची जाण असणे आणि त्याचे उपजत ज्ञान असणे, ही देवी देणगीच असते. लाखो व्यक्तींमधून अगदी निवडक कही व्यक्तींना ही देणगी मिळते. मला ती मिळाली, यासाठी मी कृतज्ञ आहे. आमच्या घरातील सगळ्याच व्यक्ती पाच क्षेत्रात होत्या, त्यामुळे घरात ते बातावरण होतेच. संगीताचा विचार मला माझ्या वडिलांकडून मिळाला. लहानपणापासून मला याचीच ओढ होती. वडिलांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी सादरीकरण बरत असताना माइयात चांगली गुणवत्ता आहे, अशी प्रतिक्रिया अनेक जण देत असत, उस्ताद गुलाम अली खाँ यांच्या गझल ऐकून मी खूप प्रभावित झालो आणि या क्षेत्रात येण्याचा निर्णय निश्चित केला.
दिल्लीतून मुंबईला स्थलांतर करणे आणि शून्यापासून सुरुवात करून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करणे, हा प्रवास नक्कीच आव्हानात्मक असेल. या प्रवासाविषयी काय सांगाल?
हा प्रवास अनेक अडवयांचा आणि कठीण होता, आमचे मध्यमवर्गीय कुटुंब होते, फार आर्थिक सुबत्ता नव्हती, लहानपणापासून कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नसे, त्यासाठी संयम ठेवण्याची सवय लागली होती; पण आई- वडिलांसाठी ही परिस्थिती बदलण्याची सतत इच्छा होती. त्यातून मग मी हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळलो. संघर्ष करत करत पार्श्वगायक म्हणून स्वतःची हळूहळू ओळख तयार केली.
आपण उपशास्त्रीय, गझल, सूफी, रोमॅटिक अशा सर्व शैलीतील गाणी गायली आहेत ? यासाठी काही विशिष्ट रियाज किंवा तयारी करावी लागते का? कोणत्या शैलीतील गाणी गाताना सर्वाधिक आनंद मिळाला?
माझ्या मते सर्व शैलीतील गाणी गाण्यासाठी तुमच्याकडे उपजत ज्ञान आणि संगीताचा विचार असणे आवश्यक आहे. कारण, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शैली तुम्ही शिकू शकत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत येतानाच मी ठरवले होते की कोणत्याही शैलीतील गाणे असेल, तरी मी पूर्ण क्षमतेने ते गाण्याचा प्रयत्न करेन. स्वतःला कोणत्याही एका शैलीभोवती सीमित ठेवणार नाही. त्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता ठेवली, त्यामुळेच अगदी वेगवेगळ्या शैलीतील गाणी मी गाऊ शकलो आणि स्वतःला अष्टपैलू गायक म्हणून सिद्ध करू शकलो.
आजवरच्या गायलेल्या गाण्यांपैकी कोणते गाणे सर्वाधिक आव्हानात्मक वाटले आणि कोणत्या गाण्याने सर्वाधिक समाधान दिले?
खरेतर अशी अनेक गागी आहेत; पण सर्वाधिक समाधान देणारी दोन गाणी आहेत. त्यातील एक म्हणजे, 'अर्जियां', या गाण्याची चाल अतिशय सुंदर आहे. दूसरे एक गागे म्हणजे 'जान-ए-बहारा' याशिवाय 'तू जो मिला', 'कुन फाया कुन' ही गामीही आव्हानात्मक होती. 'श्रीवल्ली' या गाण्यात मी अगदी वेगळा प्रयोग बेला, तो देखील श्रोत्यांनी स्वीकारला, याचा आनंद आहे. मात्र, प्रत्येक वेळी कोणतेही गाणे गाताना किंवा मैफिलीत सादरीकरण करताना से लोकांना आवडेल की नाही, याची सतत भीती असते. त्यामुळे प्रत्येक वेळी ही शेवटची संधी आहे असे समजून अतिशय प्रामाणिकपणे आणि शंभर टक्के क्षमता पणाला लावून गाण्याचा प्रयत्न मी करत असतो.
आपण अनेक 'रिअॅलिटी शो' साठी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. आजच्या काळात अनेक गायक या 'रिअॅलिटी शो 'कडे झटपट प्रसिद्धीचे आणि संगीत क्षेत्रात जाण्याची सोपी वाट म्हणून पाहत आहेत, जे गायक संगीत क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांना काय सांगाल ?
'रिअॅलिटी शो मध्ये गेल्यावर आपली पुढची वाटचाल अगदी सोपी होईल, असा विचार अनेक गायक करतात, यात जो मापक भविण्यात पार्श्वगायक होण्याच्या हेतूने किंवा स्वतंत्र संगीतकार होण्याच्या उद्देशाने येतात, त्यांना फायदा होऊ शकतो, त्यांचे उदिष्ट चांगले असल्याने मेहनत घेतल्यास त्यांना या व्यासपीठाचा उपयोग होऊ शकतो. मात्र, केवळ प्रसिद्धीच्या उद्देशाने जे या व्यासपीठावर येतात, त्यचि नुकसान होते. कारण, अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून मिळणारी प्रसिद्धी तात्कालिक असते. पुढच्या कार्यक्रमात नवे गायक आल्यावर कुन्या गायकांना लोक विसरून जातात. त्यामुळे प्रसिद्धीच्या उद्देशाने नाही, तर काहीतरी चांगले करण्याचा उद्देशाने 'रिअॅलिटी शो मध्ये आल्यास फायदा होऊ शकतो.
संगीत आणि आरोग्याचे नाते कसे आहे?
संगीत आणि आरोग्याचे अतिशय जवळचे नाते आहे. तुमचे स्वास्थ्य उत्तम असेल, तर तुम्हाला मानसिक शांतता मिळेल, संगीत हा यासाठीचा अतिशय उत्तम मार्ग आहे. उत्तम संगीत प्रत्येक व्यक्तीसाठी औषधासारखे आहे. माझ्या मैफिलीतून देखील हाच अनुभव देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुणेकर रसिक संगीताचे जाणकार असून त्यांच्यासमोर सादरीकरण करण्यासाठी मी उत्सुक आहे.
- महिमा ठोंबरे