१९६०चे दशक खूपच रोमांचक होते. या काळात जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. चीन आणि पाकिस्तानच्या आक्रमणांना सामोरे जावे लागले. गोव्याला स्वातंत्र्य मिळाले आणि सिक्कीमचे विलीनीकरण झाले. याच काळात इंदिरा गांधी यांचा उदय झाला. लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली हरित क्रांती घडली. तसेच माझ्या निवडीनुसार पाच तरुण भारतीयांनी देशातील युवकांचे आदर्श बनण्याची कामगिरी केली आहे.
हवलदार अब्दुल हमीद :
सीएलआर जेम्स एकदा लिहितात की, “एका राष्ट्रीय नायकाचे एक राष्ट्र असले पाहिजे. पूर्वीचे राष्ट्र राष्ट्रीय नायकासाठी टाळ्या वाजवण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते.” अब्दुल हमीद राष्ट्रीय नायक आहेत. वयाच्या ३२व्या वर्षी त्यांनी प्राणार्पण केले. पण त्यापूर्वी १९६५च्या युद्धात पाकिस्तानला युद्धभूमीवर आणि कूटनीतीत पराभवाचा सामना करावा लागला. आयुब खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. त्यांनी प्रचार केला की ते भारतातील मुस्लिमांना वाचवण्यासाठी आले आहेत. पाकिस्तानच्या सैन्याला अमेरिकेतून मिळालेल्या पॅट्टन रणगाड्यांवर विश्वास होता. परंतु त्यांना माहीत नव्हते की ४ ग्रेनेडियर्सचा एक भारतीय मुस्लिम अब्दुल हमीद हा त्यांच्या संपूर्ण टँक तुकडीला पुरून उरेल.
अब्दुल यांच्याकडे जिपवर बसवलेली आरसीएल गन होती. ८ सप्टेंबर १९६५ ला पाकिस्तानच्या सैन्याने पंजाबमधील खेम करण क्षेत्रात सर्वात प्रगत रणगाड्यांसह आक्रमण केले. सकाळी ९ वाजता हमीद यांनी पाकिस्तानी टँक बटालियन आपल्या बटालियनकडे येताना पाहिली. जिपवर बसवलेल्या आरसीएल गनसह त्यांनी पर्यायांचा विचार केला. अर्थात आरसीएल गन ही पॅट्टन टँक्सच्या तुकडीच्या तुलनेत काहीच नव्हती.
अशातच निर्णय झाला. ते पॅट्टन रणगाड्यांशी आरसीएल गनने लढणार होते. ऊसाच्या शेतात लपून त्यांनी जिप दृष्टीबाहेर ठेवली. त्यांना वाटले की समोरचा रणगाडे गोळीबाराच्या टप्प्यात आहे तेव्हा त्यांनी गोळी झाडली. त्यावेळी तो रणगाडे जळून खाक झाला. ३० यार्ड अंतरावर रणगाड्यांवर आरसीएल गनने गोळीबार करणे हे विलक्षण धैर्याचे कृत्य आहे. मागे येणाऱ्या इतर पाकिस्तानी सैनिकांनी आपले रणगाडे सोडले आणि पळ काढला.
परिणामी तीन पॅट्टन रणगाड्यांचा पराभव झाला. एक नष्ट झाला आणि दोन जप्त झाले. ही कामगिरी खरोखरच अभूतपूर्व होती. लवकरच त्यांनी आणखी रणगाडे नष्ट केले. पुढच्या संध्याकाळपर्यंत अधिकाऱ्यांनी परमवीर चक्रासाठी शिफारस पाठवली होती. १० सप्टेंबरला परमवीर चक्र मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी, हमीद यांनी अनेक रणगाडे नष्ट केले आणि देशासाठी प्राणार्पण केले. ९ पेक्षा जास्त रणगाडे नष्ट करून आणि अनेक जप्त करून त्यांनी पॅट्टन रणगाड्यांच्या अजिंक्यपणाचा भ्रम तोडला.
भारतीयांना आरसीएल गनने रणगाडे नष्ट करण्याची कला समजली. यानंतर जवळपास प्रत्येक भारतीय सैनिकाने जिपवरील आरसीएल गनने पाकिस्तानी रणगाड्यांशी लढाई जिंकली. भारताला हवाहवासा राष्ट्रीय नायक मिळाला. पाकिस्तानचा दावा होता की भारतात मुस्लिमांना दुर्लक्षित केले जाते, अशातच त्यांच्या बलिदानाने पाकिस्तानला युद्धभूमीवर आणि आंतरराष्ट्रीय कूटनीतीत पराभूत केले. हा माणूस उच्चपदस्थ अधिकारी नव्हता, परंतु त्यांनी कमीतकमी शस्त्रास्त्रांसह जगातील सर्वोत्तम रणगाड्यांना धैर्य आणि बुद्धिमत्तेने पराभूत केले.
मन्सूर अली खान पटौदी :
१०५०च्या दशकापर्यंत भारत प्रामुख्याने हॉकी खेळणारा देश होता. क्रिकेट लोकप्रिय होतं, पण ते शहरी केंद्रांपुरते मर्यादित होते. त्यावेळी क्रिकेट संघाला दुबळा समजले जायचे. १९६१ मध्ये भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा चमकला. हा तारा होता मन्सूर अली खान पटौदी. ज्यांना नवाब पटौदी किंवा टायगर पटौदी म्हणून ओळखले जायचे.
इफ्तिखार अली खान यांचा मुलगा मन्सूर अली खान यांनी इंग्लंडसाठी पदार्पणात शतक ठोकले आणि नंतर भारतासाठी खेळले. त्यांनी १९६० मध्ये ऑक्सफर्डसाठी खेळताना विक्रम मोडला. त्याच वर्षी रस्त्यावरील अपघातात त्यांनी एक डोळा गमावला. सर्वांना वाटलं की ते पुन्हा खेळू शकणार नाहीत. पण टायगर पटौदी सहा महिन्यांत भारतीय संघासाठी पदार्पणाला परतले. त्यांनी इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले.
२१ वर्षे ७७ दिवसांत ते कर्णधार बनले. त्यावेळी ते सर्वात तरुण कर्णधार होते. त्यांनी खेळलेल्या ४६ कसोटींपैकी ४० मध्ये त्यांनी कर्णधारपद भूषवले. १९६०चे दशक त्यांचे होते. गांगुली किंवा धोनी यांच्यापूर्वी टायगर पटौदी यांनी भारतीय संघाला आक्रमक खेळाचे नेतृत्व दिले. त्यांच्या नेतृत्वाखालील संघाने पहिली परदेशी कसोटी आणि मालिका जिंकली. त्यांचे क्षेत्ररक्षण सर्वोत्तम मानले जायचे. त्यांची फलंदाजी आक्रमक आणि आकर्षक होती. भारतीयांना विजयाची सवय लागली. संघाने हळूहळू का होईना पण जिंकायला शिकले. त्यांच्यानंतरच्या खेळाडूंना आत्मविश्वास आणि आक्रमकता मिळाली. पुढच्या पिढीने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३मध्ये विश्वचषक मिळवला.
मनोज कुमार :
भारताच्या फाळणीनंतर वयाच्या २०व्या वर्षी एका व्यक्तीला स्थलांतर करावे लागले. त्या व्यक्तीने १९६५मध्ये ‘शहीद’ चित्रपटात भगतसिंग यांची भूमिका साकारली. त्यावेळी भारताने चीनचे आक्रमण परतवून लावले होते आणि पाकिस्तान युद्धाचे आघाडी उघडण्याच्या तयारीत होता.
मनोज कुमार यांनी या भूमिकेसाठी चार वर्षे संशोधन आणि वाचन केले. भगतसिंग यांच्यासोबत विधानसभेत बॉम्ब फेकणारे बटुकेश्वर दत्त यांनी चित्रपटाची कथा लिहिली. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी या चित्रपटाचे कौतुक केले. त्यांनी मनोज कुमार यांना ‘जय जवान जय किसान’ या घोषणेवर चित्रपट बनवण्याची विनंती केली. परिणामी, १९६७मध्ये ‘उपकार’ चित्रपट आला. त्यातील ‘मेरे देश की धरती’ हे गाणं प्रसिद्ध झालं.
मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी भारतकुमार हे नाव मिळाले. त्यांच्या चित्रपटांमधील देशभक्ती आत्मपरीक्षणात्मक होती. देशाच्या विकासासाठी काम करण्याचा संदेश होता. हरित क्रांतीच्या काळात त्यांनी सामान्य लोकांसाठी आदर्श प्रदान केला.
रीटा फारिया :
मुंबई म्हणजे तेव्हाच्या बॉम्बेमधील ग्रँट मेडिकल कॉलेजमधील २३वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीने नोव्हेंबर १९६६ मध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकून आंतरराष्ट्रीय स्तर गाजवले होते. गोव्यातील रीटा फारिया या एमबीबीएस विद्यार्थिनी आणि हॉकी खेळाडू होत्या. त्या मिस वर्ल्ड जिंकणाऱ्या पहिल्या आशियाई महिला ठरल्या. त्या आधुनिकता, पूर्व संस्कृती आणि शिक्षण यांचा परिपूर्ण संगम होत्या.
या एमबीबीएस विद्यार्थिनीने स्विमसूट फेरीत ‘बेस्ट इन स्विमसूट’ आणि साडीतील ‘बेस्ट इन इव्हनिंगवेअर’ फेरी जिंकली. त्या काळात तरुण भारत आधुनिकतेच्या द्विधेत होता. काय स्वीकारावं आणि काय नाही, याबाबत संभ्रम होता. त्याचवेळी रीटा यांनी दाखवून दिले की भारतीय मुली स्विमसूट आणि साडी दोन्ही आत्मविश्वासाने परिधान करू शकतात.
भारताची सौंदर्यवती ही बाजारपेठेची वस्तू नसून सुशिक्षित डॉक्टर असावी. यापुरतंच नाही, तर त्यांनी नंतर परिपूर्ण आदर्श ठरवले. मॉडेलिंग आणि चित्रपटांच्या आकर्षक ऑफर्स नाकारून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. लंडनमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि वैद्यकीय व्यवसाय केला. १९६६ नंतर जन्मलेल्या शहरी भारतातील मुलांना अजूनही आठवते की त्यांच्या पालकांनी रीटा फारिया यांना आदर्श मानायला सांगितले होते.
अमीन सयानी :
भारतातील रेडिओला परिभाषित करणारा एक आवाज आहे, तो म्हणजे अमीन सयानी यांचा. १९५०, ६०, ७०, ८० आणि ९० च्या दशकात ते भारताचे निर्विवाद आवाज होते. वयाच्या २०व्या वर्षी त्यांनी रेडिओ सिलोनवर बिनाका गीतमाला सादर करायला सुरुवात केली. हा कार्यक्रम दर बुधवारी रात्री ८ वाजता प्रसारित होत असे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष रहीमतुल्ला सयानी यांचे नातू असलेले सयानी भारतातील सर्वात ओळखीचा आवाज होते. त्यांची विशिष्ट शैली यापूर्वी रेडिओसाठी अयोग्य मानली गेली. नंतर रेडिओ उद्घोषक, समालोचक, जाहिरातदार आणि सर्वांनी ती कॉपी केली. सयानी यांचा आवाज आणि उच्चारण हे सुवर्णमानक मानले गेले. तरुण त्यांचे अनुकरण करायचे. प्रदर्शन आणि मेळाव्यांमधील स्थानिक घोषणा त्यांच्या शैलीत ऐकू यायच्या. अमिताभ बच्चन यांच्या उदयापूर्वी आवाजाच्या बाबतीत सयानी हे भारतातील सर्वात आदर्श व्यक्ती होते.