बारामतीत पोलिसांनी जपला धार्मिक सौहार्द

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 28 d ago
मुस्लिम समाज बांधवांसोबत पोलिस अधिकारी.
मुस्लिम समाज बांधवांसोबत पोलिस अधिकारी.

 

"कोणत्याही धर्मात हिंसेचे समर्थन केले जात नाही. धर्मान दिलेले विचार आचरणात आणणे हीच ईश्वरसेवा आहे," असे मत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे प्रभारी आयपीएस अधिकारी दर्शन दुगड यांनी व्यक्त केले.

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील मुस्लिम समाज बांधवांना मशिदीमध्ये पोलिसांच्या वतीने इफ्तार पार्टी देण्यात आली. यावेळी जमलेल्या मुस्लिम समाज बांधवांशी दुगड यांनी संवाद साधला. याप्रसंगी सह पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोलिस हवालदार महेश पन्हाळे, तौफीक मानेरी, अमोल भुजबळ, ज्ञानेश्वर करे, रणजित देशमुख उपस्थित होते.

सोशल मीडियाचा वाढता वापर तरुणांच्या मध्ये आहे. समाजात तेढ निर्माण करणारे पोस्ट किंवा चित्रीकरण आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. एखाद्या घटनेची खात्री केल्याशिवाय पोस्ट फॉरवर्ड करू नये, आपल्याकडून चुकीची माहिती जाता कामा नये याची काळजी प्रत्येकान घ्यावी. "लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात समाजातील सुज्ञ नागरिक हेच आमचे कान, नाक, डोळे आहेत, यामुळे मिळालेली माहिती पोलिसांना सांगा आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल," असा विश्वास पोलिसांच्या वतीने देण्यात आला. यावेळी मुन्ना दस्तगीर बागवान, आजीम इलाही इनामदार, तौफिक बागवान, इरफान बागवान, रिजवान पठाण, जावेद बागवान, सलमान आतार, शाहीद बागवान, शब्बीर भाई कोरबू, शिकंदर भालदार, शाबुद्दीन मनेर उपस्थित होते.