अवयवदानासाठी पुढे यावं, PM मोदींचं आवाहन!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
‘मन की बात’- अवयवदानाचे महत्व
‘मन की बात’- अवयवदानाचे महत्व

 

२०१३ मध्ये आपल्या देशात अवयवदानाची ५ हजारांहून कमी प्रकरणं होती, पण २०२२ मध्ये ही संख्या १५ हजारांहून अधिक झाली आहे. ज्या व्यक्तींनी अवयव दान केलं, त्यांच्या कुटुंबीयांनी खरोखरच मोठं कार्य केलंय, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमात व्यक्त केलं.

 

आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आपली संपूर्ण पेन्शन खर्च करतात. तर, काहीजण आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई पर्यावरण आणि प्राण्यांच्या सेवेसाठी समर्पित करतात, असंही मोदी म्हणाले.

 

आपल्या देशात चॅरिटीला इतकं उच्च स्थान देण्यात आलंय की, लोक इतरांच्या आनंदासाठी आपलं सर्वस्व दान करण्यास मागंपुढं पाहत नाहीत. आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या युगात अवयवदान हा एखाद्याला जीवन देण्याचा उत्तम मार्ग आहे, असंही मोदींनी सांगितलं.

 

पंतप्रधान पुढं म्हणाले, अवयवदानाची सर्वात मोठी भावना ही आहे की, जाता-जाता कोणाचा तरी जीव वाचला पाहिजे. अवयवदानाची वाट पाहणाऱ्यांना प्रतिक्षेतील प्रत्येक क्षण कसा जातो, हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. ही प्रतीक्षा वेळ खूप कठीण आहे. अशा स्थितीत दाता मिळाला तर त्यांना भगवंताचंच रूप दिसतं. 'मन की बात'मध्ये झारखंडच्या रहिवासी असलेल्या स्नेहलता चौधरीचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, 'तिनं देव बनून इतरांना जीवन दिलं. तिनं तिचं हृदय, किडनी आणि यकृत दान केलं.'

 

 

‘मन की बात’मध्ये लष्करातील महिलांबाबत पंतप्रधान म्हणाले, 'आज आपल्या तिन्ही सैन्यात देशाच्या कन्या शौर्याचा झेंडा फडकावत आहेत. स्त्रीशक्तीची ही ऊर्जा विकसित भारताची जीवनवाहिनी आहे. सौरऊर्जेच्या क्षेत्रात भारत ज्या वेगानं पुढं जात आहे, ती स्वतःच मोठी उपलब्धी आहे. भारतातील लोकांचं शतकानुशतके सूर्याशी विशेष नातं आहे.'