काश्मीर खोऱ्यात दरवळतोय ट्युलिपचा सुगंध

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 28 d ago
ट्युलिप फुले
ट्युलिप फुले

 

जावेद मात्झी 
काश्मीर खोऱ्यात ट्युलिपच्या फुलांचा वार्षिक हंगाम सुरू झाला असून राजधानी श्रीनगरमधील उद्यानांत सुमारे सात लाखांहून अधिक ट्युलिप फुलत आहेत. राज्याबाहेरील पर्यटकांबरोबर ती स्थानिकांनाही आकर्षित करत आहेत. प्रसिद्ध दल सरोवरापासून अवघ्या काही मीटरवर असणारे इंदिरा गांधी स्मृती ट्युलिप उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी उद्यानात गर्दी करणाऱ्या पर्यटकांच्या चेहन्यांवरही आनंद फुलला होता. 

विविध प्रजार्तीचे लाखो ट्युलिप पाहणे ही देशविदेशातील पर्यटकांसाठी अनोखी पर्वणीच असते. उद्यानात पर्यटकांची झुंबड उडत असतानाच येत्या काही दिवसांत ट्युलिप पूर्णपणे बहारात येण्याचा अंदाज आहे. या उद्यानात लाल, पिवळा,गुलाबी आदी रंगांतील ट्युलिपची रंगपंचमीच पर्यटकांना पाहायला मिळेल. एकीकडे, झाबरवान पर्वताच्या पायथ्याला ट्युलिपचे देखणे उद्यान साकरल्याबद्दल पर्यटक प्रशासनाचे आभार मानतात तर दुसरीकडे, अनेक पर्यटक काश्मिरी रहिवाशांचे आदरातिथ्य आणि पाहुण्यांबद्लच्या प्रेमामु भारावून जात आहेत. या उद्यानाला भेट दिल्याबद्दल अनेक पर्यटक समाधान व्यक्त करतात. तसेच काश्मीरमधील हा स्वर्ग सोडून इतरत्र न जाण्याचा सल्लाही ते इतर पर्यटकांना देत आहेत.

जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद यांच्या संकल्पनेतून श्रीनगरमध्ये हे ट्युलिप उद्यान साकारले गेले. बंगलोरमधून ट्युलिप उद्यान पाहण्यासाठी प्रथमच आलेल्या पर्यटक जोडप्याने प्रत्येकाने किमान एकदा तरी हे उद्यान पाहायलाच हवे, असे सांगितले. उद्यान खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक व देशविदेशातील हजारो पर्यटकांनी टयुलिप पाहण्याचा आनंद लुटला. उद्यान आणखी महिनाभर खुले राहणार आहे. 

आशिष नावाच्या एका पर्यटकाने काश्मीरच्या खोऱ्यातील वर्णन केले. ते म्हणतात "हे उद्यान खुले होण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात इतर ठिकाणांना भेट दिली. मात्र, श्रीनगरमधील ट्युलिप उद्यानातील बहरू लागलेल्या ट्युलिपनी आधीच्या सर्व स्मृती पुसून टाकल्या. ट्युलिपचे हे जगातील सर्वोत्तम उद्यान आहे. मला स्वर्गात भटकंती करत असल्यासारखे वाटत आहे. उद्यान पाहण्याची बालपणापासूनची इच्छा पूर्ण झाली."

याशिवाय पुष्पसंवर्धन विभागाचे आयुक्त फय्याज शेख यांनी सांगितले की, श्रीनगरमधील ट्युलिप उद्यानात आम्ही यावर्षी आणखी काही प्रजार्तींची भर टाकली आहे. उद्यानातील ट्युलिपच्या एकूण प्रजार्तीची संख्या आता ७३ वर गेली आहे. गेल्या वर्षी पावणेचार लाख पर्यटकांनी उद्यानाला भेट दिली होती. यावर्षी यापेक्षा अधिक पर्यटक येण्याची शक्यता आहे.
 
-जावेद मात्झी