भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर नेहमीच तणावाचे वातावरण असते. त्यामुळे दोन्ही देशांमधील राजकीय वातावरणही तापलेले आहे. या कारणास्तव गेल्या १२ वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली गेली नाही. दोन्ही देश फक्त आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.
BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला जे आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निमंत्रणावरून पाकिस्तान दौर्यावरून परतले होते, त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिका पुन्हा सुरू करण्याबाबत विचारले असता रॉजर बिन्नी यांनी तसे संकेत दिले.
राजकीय तणावामुळे गेल्या १२ वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. पाकिस्तान दौऱ्यावरून परतलेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षांना भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, मी यावर निर्णय घेऊ शकत नाही. हे प्रकरण सरकारशी निगडीत असून केवळ आमचे सरकारच हा निर्णय घेईल. विश्वचषकात पाकिस्तान संघ भारतात सामने खेळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रॉजर बिन्नी म्हणाले की, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबतची बैठक खूप चांगली झाली. तिथे आमची चांगलीच काळजी घेतली गेली. आमचा मुख्य अजेंडा सामना पाहणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा होता. एकूणच आमचा पाकिस्तान दौरा खूप छान होता. त्याचवेळी राजीव शुक्ला म्हणाले की, 'आमची भेट चांगली झाली. पीसीबीने आमची चांगली काळजी घेतली. सुरक्षा अतिशय कडेकोट होती आणि व्यवस्थाही उत्तम होती.