शैलेश नागवेकर
क्रिकेट विश्वात भारतीय महिलांनी अटकेपार झेंडा रोवला. दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदा एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला. गेल्या दीड वर्षात भारतीय पुरुष आणि महिलांनी आयसीसीचे तीन करंडक जिंकून आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे.
या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. सर्व खेळाडूंचे अभिनंदन ! हा ऐतिहासिक विजय भविष्यात खेळाडूंना प्रेरक ठरेल."
मूळ संघात स्थान नसलेली, मात्र बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या शेफाली वर्माच्या ८७, स्मृती मानधना (४५), दीप्ती शर्मा (५८) आणि रिचा घोषच्या ३४ धावांमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ७बाद २९८ धावा केल्या. आफ्रिकन कर्णधार लॉरा वॉलवर्टने शतक करून झुंज दिली. परंतु, चार विकेट मिळवणाऱ्या दीप्ती शर्मासह इतर गोलंदाजांनीही योगदान दिले.
आव्हान मोठे असले, तरी दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रतिकार करणार हे उघड होते. कारण त्यांची सलामीवीर आणि कर्णधार लॉरा वॉलवर्ट यंदा कमालीची सातत्य दाखवत होती. आज पुन्हा एकदा ती निर्धाराने उभी राहिली. ताझमिन ब्रिटसह अर्धशतकी सलामी दिली, पण त्याचवेळी भारताला पहिले यश धावचीतच्या रूपाने मिळाले. अमनज्योत कौरने यष्टींचा अचूक वेध घेतला आणि भारतीय संघ आज क्षेत्ररक्षणात उजवी कामगिरी करणार, याचे संकेत मिळाले, तरीही अंतिम टप्प्यात काही चुका झाल्याच. फिरकी आक्रमण सुरू झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या वाटचालीला ब्रेक लागण्यास सुरुवात झाली. यातच श्रीचरणीने बॉशला बाद केले.
खरी कलाटणी बदलो गोलंदाज शेफाली वमनि दिली. सात चेंडूत तिने दोन विकेट मिळविल्या. सुने लुझ आणि मारिझान काप या आफ्रिकेच्या दोन्ही अष्टपैलू आक्रमक फलंदाज होत्या. सामना भारताच्या बाजूने झुकत असताना राधा यादवच्या एका चेंडूने घात केला. या चेंडूवर डर्कसनने षटकार मारला, परंतु, हा चेंडू नोबॉल ठरल्यानंतर फ्री हीटवरही तिने षटकार मारला, अशा प्रकारे एका चेंडूवर १३ धावा मिळाल्यावर आफ्रिकेची गाडी ३२ व्या षटकात रुळावर आली होती. ३५ धावा करणाऱ्या डर्कसनचा झेल सोडणाऱ्या दीप्ती शमनिच तिचा त्रिफळा उडवला आणि भरपाई केली. त्यावेळी ६३ चेंडू आणि ९० धावांची गरज, असे समीकरण होते.
अमनज्योतचा अफलातून झेल
भारताच्या विजयी मार्गात अडथळा ठरत असलेल्या शतकवीर लॉरा वॉलवर्टचा अफलातून झेल अमनज्योतने हातातून सुटत असताना झेलला आणि तिथेच भारताचा विजय निश्चित झाला.
पावसानंतर धावांची बरसात
अगोदर जोरदार पाऊस, त्यानंतर भारतीय फलंदाजांकडून धावांचा पाऊस, अशा उत्साही वातावरणात महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने प्रथम फलंदाजी करताना २९८ धावा झळकावल्या. शेफाली वर्मा, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांनी मैदान गाजवले.
मुख्य संघातून वगळलेल्या, मात्र बदली खेळाडू म्हणून संघात परतलेल्या शेफाली वर्माची ८७ धावांची खेळी, तिने ४८ घावा करणाऱ्या स्मृती मानधनासह केलेली शतकी सलामी, त्यानंतर दिप्ती शर्माचे अर्धशतक आणि रिचाने दिलेला ३४ धावांचा झंझावाती जयघोष, अशी मेजवानी भारतीय पाठीराख्यांना मिळाली.
तीन तासांच्या प्रदीर्घ व्यत्ययानंतर खेळ सुरू झाला तरी पाऊस पुन्हा कधीही सुरू होईल, अशी स्थिती होती, आकाशात ढगही जमा होते. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेणार हे उघड होते. अशा आव्हानात्मक स्थितीत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान मिळाले, तर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी ते स्वीकारले आणि त्यांनी १०४ धावांची सलामी देत्त भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
बदली खेळाडू म्हणून स्थान मिळालेली शेफाली तिच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरली, परंतु आज महत्त्वाच्या सामन्यात तिने विश्वास सार्थ ठरवला, वर्षभरानंतर संघात परतत असल्याचे कोठेच जाणवले नाही इतकी सफाईदार फलंदाजी तिने केली. सुरुवातीलाच एका षटकात सलग दोन खणखणीत चौकार तिने मारले. स्मृती मानधनानेही अशीच कामगिरी केली. तेथूनच या दोघींना लय सापडली. दोघींचा धावांचा वेगही कमालीचा होता. त्यामुळे १० षटकांत ६४ धावा फलकावर लागल्या होत्या.
बघता बघता शेफाली आणि स्मृती यांनी शतकी भागीदारी केली आणि खेळपट्टी तसेच वातावरणाचा काहीच परिणाम नसल्याचा दिलासा डगआऊटसमध्ये असलेल्या आपल्या सहकारींना दिला. अर्धशतकाच्या जवळ आल्यानंतर स्मृती बाद झाली आणि त्यानंतर आलेल्या जेमिमाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले, परंतु तिची आजची खेळी २४ धावांचीच होती. त्यात तिला एकच चौकार मारता आला.
त्या अगोदर शेफालीने थाटात अर्धशतक पूर्ण केले, पण लगेचच तिचा सोपा झेल सुटला. साधारणतः २० षटकांचा खेळ झाल्यावर धावांची गती काहीशी कमी झाली. सुरुवातीला सहा धावांची गती साडेपाच अशी झाली. शेफालीचे शतकाकडे मार्गक्रमण सुरू होते, पण शतकापेक्षा संघासाठी धावांची गती वाढवण्याचा एक प्रयत्न तिच्या मुळावर आला आणि ती ८७ धावांवर बाद झाली. संक्षिप्त धावफलक भारत ५० षटकांत ७ बाद २९८ (स्मृती मानधना ४५५८ चेंडू, ८ चौकार, शेफाली वर्मा ८७७८ चेंडू, ७ चौकार, २ षटकार जेमिमा रॉड्रिग्ज २४ ३७ चेंडू, १ चौकार, हरमनप्रीत कौर २०२९ चेंडू, २ चौकार, दीप्ती शर्मा नाबाद ५८ ५८ धावा ३ चौकार, १ षटकार, रिचा घोष ३४ २४ चेडू, ३ चौकार, २ षटकार, अयाबोंगा खाका ९-० ५८-३)
हरमनप्रीत अपयशी
भक्कम सलामी मिळूनही जेमिमाप्रमाणे कर्णधार हरमनप्रीतला संथीचा फायदा घेता आला नाही. चांगल्या चेंडूपेक्षा त्यांनी स्वतः चुकीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट गमावल्या.
दीप्तीचा तडाखा
जेमिमा आणि हरमन आज अपयशी ठरल्या तरी दडपण आले नाही, कारण स्मृती, शेफाली यांच्यानंतर दीप्ती शमनि चांगल्या स्ट्राईक रेटने अर्धशतक केले.
रिचा घोषची फटकेबाजी
हरमनप्रीत बाद होणे हे भारताच्या पथ्यावरच पडले, कारण त्यानंतर रिचा घोषने थेट पाचव्या गिअरमध्येच फलंदाजी केली.
तिसरी शतकी सलामी
भारताकडून या स्पर्धेत तीन शतकी सलामी करण्यात आल्या. सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक सरासरीचाही विक्रम झाला. सलामीच्या धावा ६७९ (अगोदरचा विक्रम ३९०) सरासरी ८३.८७ (अगोदरची सर्वोत्तम ६५) तिसरी शतकी सलामी (अगोदरच्या सर्वोत्तम दोन भागीदारी)