दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवल्याने निकहतचे सर्व स्तरातून होतेय कौतुक

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राजकीय नेत्यांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राजकीय नेत्यांनी केले अभिनंदन

 

निकहत जरीनने महिला विश्वचषकात दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच देशभरातील राजकीय नेतेही खूश झाले आहेत. दोन सुवर्णपदक जिंकणारी ती दुसरी महिला ठरली आहे. या आधी मेरी कॉमने अशी कामगिरी केली होती. तिच्या विजयाची बातमी सोशल मीडियावर प्रसारित होताच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निकहत जरीन यांच्यात चांगले बॉन्डिंग असल्याने, त्यांच्या शुभेच्छा येणे स्वाभाविकच होते. निकहतसाठी पंतप्रधानांनी दिलेले विशेष अभिनंदन संदेशातून यावर शिक्कामोर्तब होतो. बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन आणि निकहत जरीन यांचे पंतप्रधान मोदी यांनी रविवारी अभिनंदन केले. एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी केल्याबद्दल लोव्हलिना बोगोरहाईचे अभिनंदन. तिने उत्तम कौशल्य दाखवले. तिच्या सुवर्णपदकाबद्दल भारत आनंदी आहे.”

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील 50 किलो लाइट फ्लायवेट प्रकारात निकहतच्या शानदार विजयाबद्दल अभिनंदन करताना त्यांनी पुढे ट्विट केले की, “निकहत जरीनला तिच्या शानदार विजयासाठी आणि जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाबद्दल अभिनंदन. ती चॅम्पियन आहे. तिच्या यशाचा भारताला दरवेळी अभिमान वाटला आहे.”

निकहत आणि बोरगोहेन या दोघांनीही नवी दिल्लीतील महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवून भारताचा रविवार सुवर्णमय केला. निकहतने 50 किलो गटात सुवर्णपदक मिळवले, तर बोरगोहेनने 75 किलो गटात कास्यपदक मिळवले. निकहतने अंतिम फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमवर 5-0 असा विजय मिळवला आणि स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. तत्पूर्वी, लोव्हलिना बोर्गोहेनने ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करविरुद्ध 5-2 अशा फरकाने विजेतेपदाचा सामना जिंकला. निकहतने गेल्या वर्षी ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते.

यावेळी तिने 50 किलो गटात प्रवेश करत सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे ऑलिम्पिकमधील  50 किलो या गटात सहभागाचा तिचा मार्ग मोकळा झाला आहे. हा बदल तिच्यासाठी आव्हानात्मक होता. निकहतच्या विजयाची बातमी समजताच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तिचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट केले की, "महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील तिच्या शानदार विजयाबद्दल अभिनंदन. आज भारतासाठी आणखी एक दुहेरी सुवर्णपदक देशाच्या नावावर झाले. तुमच्या यशाचा भारताला अभिमान आहे!

आपल्या धोरणांनी प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांना मात देणारे गृहमंत्री अमित शहा देखील निकहतचे अभिनंदन करण्यात मागे राहिले नाहीत. त्यांनी लिहिले कि, “2023 च्या महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण जिंकल्याबद्दल अभिनंदन! तुमचे अभूतपूर्व यश युवकांमध्ये विजयासाठी झटण्याची अखंड उत्कट इच्छा निर्माण करेल. तुमच्या भावी प्रयत्नांसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.”

तर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी निकहत जिंकल्याबद्दल तीच्या गळ्यात सुवर्णपदक घातले असले, तरी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन करण्यात तेही थांबले नाहीत. त्याने लिहिले कि, “IBA महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून निकहत जरीन तुम्ही भारताचा अभिमान वाढवला आहे!”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही निकहत यांचे अभिनंदन केले आहे. त्याने ट्विट केले कि, “निकहत जरीन, इतिहास रचल्याबद्दल आणि महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल अभिनंदन! या स्पर्धेत लागोपाठ सुवर्णपदक जिंकणारी दुसरी बॉक्सर बनल्याबद्दलही आपले अभिनंदन!”

तर, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “निकहत जरीनने व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा पराभव केला. हा खूप छान दिवस आहे.” त्याचबरोबर, निकहतच्या विजयावर महाराष्ट्राचे राजकीय खेळाडू देवेंद्र फडणवीस म्हणाले, “वाह! महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमने 5-0 ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. या चॅम्पियनशिपमधील निकहतचे हे सलग तिसरे आणि भारताचे तिसरे सुवर्ण आहे. वर्ल्ड चॅम्पियन झाल्याबद्दल निकहत जरीनचे अभिनंदन! निकहत भारताला तुमचा अभिमान आहे!”